esakal | हस्तमैथून साधारणपणे कितीदा करावे?
sakal

बोलून बातमी शोधा

हस्तमैथून साधारणपणे कितीदा करावे?

शरीर संबंध हा मानवाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असूनही त्याकडे केवळ लैंगिकतेच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं.

हस्तमैथून साधारणपणे कितीदा करावे?

sakal_logo
By
डॉ. अविनाश भोंडवे

स्त्री-पुरुष शारीरिक संबंधानंतर माणसाचा जन्म होतो. शरीर संबंध हा मानवाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असूनही त्याकडे केवळ लैंगिकतेच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. यातून चुकीची माहिती मिळणं आणि या विषयाबाबत अनभिज्ञ असण्याची शक्यता असते. यालाही अनेक कारणे आहेत. तरुण वयात या विषयाबद्दल वेगवेगळे प्रश्न, शंका मनात निर्माण होतात. त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताही असते पण योग्य त्या मार्गदर्शनाअभावी काही प्रश्न अनुत्तरीत राहतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती 'सकाळ डिजिटल'च्या माध्यमातून देणार आहेत.

1. हस्तमैथून साधारणपणे कितीदा करावे?

उ.लैंगिक समाधान ही एक मानसिक गरज असते. तिच्या वारंवारतेप्रमाणे ही क्रिया केली जाऊ शकते. काळजी फक्त एवढीच घ्यावी की त्यामुळे लिंगावरील त्वचेला या हस्तमैथुनामुळे, इजा किंवा जखमा होणार नाहीत. ज्याप्रमाणे लैंगिक शरीरसंबंधात एकदा संभोग झाल्यावर दुसर्‍यांदा करणे त्रासदायक असते, तसेच हस्तमैथुनाचेदेखील असते, कारण वीर्यथैली एकदा रिकामी झाली की, पुन्हा ती भरण्यास काही तास जातात. त्यामुळे हस्तमैथुनही जास्त वेळा केल्यास लिंगाला त्रास होऊ शकतो, सूजही येऊ शकते.

2. माझे अंडाशय हे थोडे वर खाली आहे. डावे वृषण हे उजव्या वृषणापेक्षा थोडे खाली आहे. हा काही आजार तर नाही ना? माझ्या पुढच्या आयुष्यात याचा काही त्रास तर होणार नाही ना?

उ. लिंगाच्या वक्रतेप्रमाणे हा सुध्दा नैसर्गिक दोष असतो. आपल्या शरीरात कित्येक गोष्टी थोड्या फार प्रमाणात शरीररचनाशास्त्राच्या पुस्तकात दाखवतात तशा नसतातच. पण हे अवयव त्यांचे नेमून दिलेले काम योग्य पद्धतीने करतायत ना? हे महत्वाचे असते. वृषणे जर थोडी खालीवर असतील, तर त्यात अनैसर्गिक काही नाही. आणि यासाठी कुठलाही उपचार करायची गरज नाही.

हेही वाचा: लिंगाचा आकार खूप लहान असल्याचा भवितव्यात काही त्रास होईल का?

3. रोज सकाळी मला जाग येते, तेव्हा माझे लिंग कडक झालेले असते. हा काही आजार तर नाही ना?

उत्तर. लिंगाची किंवा शिश्नाची ताठरता ही सर्वथा अनैच्छिक क्रिया आहे, हे आपण पाहिले. ही क्रिया दोन गोष्टींनी नियंत्रित होते.एक म्हणजे भरलेले मूत्राशय आणि दुसरे लैंगिक भावनांचे उद्दीपन. सकाळी जाग आल्यानंतर शिश्न ताठर होण्याचे मुख्य कारण म्हणजे लघवीने भरलेले मूत्राशय हे असते. तुम्ही बाथरूमला जाऊन आलात की मूत्राशयही रिकामे होते आणि लिंगाचा ताठरपणा देखील निघून जातो. ही पूर्णतः नैसर्गिक शरीरक्रिया आहे.

loading image
go to top