Kitchen Astro Tips: स्वयंपाक घरातल्या ह्या गोष्टी कोणाला देत असाल तर सावधान, नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kitchen Astro Tips

Kitchen Astro Tips: स्वयंपाक घरातल्या ह्या गोष्टी कोणाला देत असाल तर सावधान, नाहीतर...

Kitchen Astro Tips: प्रत्येकजण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी, कुटुंबाला समाधानी ठेवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतो, पण अनेकदा ते परिश्रम निष्फळ ठरतात. तुम्हालाही आनंदी राहायचे असेल, घरात सुख समृद्धी नांदावी असे वाटत असेल तर ह्या स्वयंपाक घराशी निगडित गोष्टी जाणून घ्या.

ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या स्वयंपाक घरातल्या अशा अनेक गोष्टी असतात ज्या दान केल्याने व्यक्तीचे आयुष्य बदलते. ज्योतिष शास्त्रात दान करणे चांगले मानले जाते, पण असेही म्हटले आहे की, आपण काहीही दान करताना थोडी काळजी घेतली पाहिजे. किचनमध्ये काही खास वस्तू आहेत ज्या चुकूनही कोणाला दान करू नयेत. जर कोणी असे केले तर घरातील सुख-समृद्धी हिरावून घेतली जाऊ शकते आणि आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. चला जाणून घेऊया किचनमधील कोणकोणत्या गोष्टी कोणाला देणे टाळावे.

हेही वाचा: Astro Tips : घरात कोणत्या दिशेला लावावे मोर पिस? ज्यामुळे येईल सकारात्मक ऊर्जा

१. हळद

हळद अतिशय शुभ मानली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार हळदीचे कधीही दान करू नये, अन्यथा घरात गुरुदोष निघू शकतो. हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणीही अडचणी येऊ शकतात.

२. तांदूळ

तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. घरात कधीही तांदूळ संपू नये, अन्यथा शुक्र दोष येऊ शकतो. शुक्र दोषामुळे घरात भांडणे सुरू होतात आणि नकारात्मक ऊर्जा कुटुंबात राहते.

३. तेल

दान करण्यापूर्वी शनिदेवाशी संबंधित गोष्टींचाही विचार करावा. मोहरीचे तेल शनि ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. अशा वेळी मोहरीच्या तेलाचे दान न करण्याची विशेष काळजी घ्यावी आणि स्वयंपाकघरातील तेलाचा डबाही रिकामा राहू नये, अन्यथा शनिदेव कोपतात.

Web Title: Sharing This Grocery Items With Others Can Make You Poor Read Carefully What Are Side Effects

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..