तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी चुकीचे Sheet Mask तरी निवडत नाही ना?

तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी चुकीचे Sheet Mask तरी निवडत नाही ना?

कोल्हापूर: चेहरा खूप थकलेला असेल आणि तो लगेचच तजेलदार दिसायचं असेल तर सीट मास्क हा एक चांगला पर्याय आहे. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार शीट मास्क (Sheet Mask)निवडणे आवश्यक असते. आपण योग्य शीट मास्क निवडला तर काही वेळेतच तुमचा चेहरा तजेलदार दिसेल. सोशल मीडियावर किंवा टीव्हीवर(Social Media or on TV) आज-काल अनेक जाहिराती दिसतात. जे ग्लोइंग स्किन चा दावा करतात. हे मास्क त्या-त्या चेहऱ्याच्या आकार प्रमाणे असतात. ज्यामध्ये सिरम असते जी आपल्या त्वचेला मऊ आणि निखळ बनवते. ही पद्धत कोरियन स्किन केअर ब्यूटी (Korean Skin Care Beauty)कडून आलेली आहे. ज्यामुळे कमी वेळेत चेहरा अधिक खुलून दिसू शकतो.

सामान्य व्यक्तीपासून ते अनेक सेलिब्रिटीना याची भुरळ पडली आहे. आलिया भट, दीपिका पदुकोण, सारा अली खान, करीना कपूर (Alia Bhatt, Deepika Padukone, Sara Ali Khan, Kareena Kapoor) असे अनेक सेलेब्रेटी या सीट मास्कचा वापर करतात. तुम्हीही या मास्कचा वापर करू शकता परंतु आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार त्याची निवड करणे आवश्यक आहे. त्वचेच्या रंगाप्रमाणे हे मास्क उपलब्ध आहेत. त्याची निवड कशा पद्धतीने करावी हे या ठिकाणी जाणून घेऊया.(Sheet Mask oily skin using tips marathi news)

शीट मास्क काय आहे..

शीट मास्क हे चेहऱ्याच्या आकारानुसार कापलेले असते. ज्यामध्ये पोषण भरपूर असे सिरम असते. हे मास्क फेशियल मास्कच्या तुलनेने वेगळे आहे. जे लावल्यानंतर चेहरा धुण्याची ची गरज पडत नाही. शीट मास्क आपल्या त्वचेला ओलसरपणा ठेवते आणि त्यामुळे मऊ पणा येतो.

शीट मास्क चे फायदे....

हे त्वचेला पोषण प्रदान करते आणि चेहऱ्याला यामुळे एक वेगळीच चमक येते. तसेच आपला चेहरा ही अधिक गोरा होतो. हे वापरण्याचे अत्यंत सोपी पद्धत आहे. हे मास्क सर्वसाधारण फेशियल मास्क पेक्षा अधिक प्रभावी ठरते. चेहऱ्यावरील थकावट यामुळे दूर होते. आणि त्वचेवरील पेशी खोलपर्यंत स्वच्छ होतात. आपल्या त्वचेला या शीट मास्क ची निवड करताना त्वचेचा प्रकार,स्वरुप आणि त्वचेची समस्या यावर अवलंबून असते. प्रत्येक त्वचेच्या प्रकारासाठी अलग-अलग शीट मास्क बाजारामध्ये उपलब्ध आहेत. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर कोरडी त्वचेवर पिंपल्स असतील तर सेन्सिटिव्ह अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे मास्क निवडणे आवश्यक आहे. याची किंमत दीडशे रुपयांपासून सुरू होते.

तेलकट त्वचा..

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर क्ले शीट मास्क ची निवड करा. अशा प्रकारचे शीट मास्क तेलकट चेहऱ्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतात क्ले मास्क आपल्या चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करतात तसेच चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा ही बाजूला होते.

कोरडी त्वचा...

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रीमी शीट मास्क ची निवड करा. असे मास्क तुमच्या त्वचेला ओलसरपणा देतात आणि कोरड्या त्वचेला मॉइस्चरायझर ही करतात. या शीट मास्क मध्ये AHAs,BHAs आणि इसेन्शियल तेल व नॅचरल बटर असे घटक असणे आवश्यक आहे. हे आपल्या त्वचेला अधिक हेल्दी आणि स्मूथ बनवतात.

एक्ने-प्रोन त्वचा:

जर तुमच्या चेहऱ्यावर अधिक मोडी असतील तर पील ऑफ शीट मास्क अत्यंत उपयुक्त ठरते. जर तुम्हाला काळ्या डागाची समस्या असेल तर ब्लॅक हेड पील ऑफ मास्क ची निवड करा. जे त्वचेवर वर हलक्या पद्धतीने एक्सफोलिएशन करते आणि आपल्या त्वचेचे छिद्र साफ करते. हे मास्क डेड स्किन साठी तसेच धूळ आणि त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करते. हे मास्क विशेषता फळ आणि विविध झाडांच्या घटका पासून तयार होते.

संवेदनशील त्वचा...

जेल वर आधारित शीट मास्क अशा त्वचेसाठी बहुत उपयुक्त ठरते. असे मास्क आपल्या त्वचेसाठी योग्यरीतीने काम करते. हे मास्क लाइटवेट असते ज्यामुळे आपली त्वचा सहजपणे ते शोषून घेते. यामध्ये ग्रीन टी, पुदिना असे घटक असणे आवश्यक आहे. हायड्रेशन बरोबरच हे स्किन ला अधिक मजबूत करतात.

कशा पद्धतीने शीट मास्क वापरावे...

थकलेल्या आणि निर्जीव त्वचेसाठी या शीट मास्कचा वापर करावा. जेव्हा तुम्हाला तुमचा चेहरा अधिक डल वाटेल, चेहऱ्यावर थकावट दिसू लागेल तेव्हा याचा वापर करू शकता. सिट मास्क वापरण्यापूर्वी आपला चेहरा फेसवॉश ने स्वच्छ करा आणि त्यानंतर मास्क चेहर्‍यावर लावा. मास्क लावल्यानंतर ते हलक्या हाताने दाबा. यामध्ये कुठेही एअर बबल राहणार नाहीत याची काळजी घ्या. पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण चेहऱ्यावरील हे शीट मास्क काढू शकता. त्यानंतर चेहऱ्यावर हाताने मसाज करा. बाजार मधून खरेदी केलेल्या मास्क शिवाय आपण घरी सुध्दा शीट मास्क बनवू शकतो.

डिस्क्लेमर: ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com