Covid-19 पुरुषांसाठी जास्त घातक की महिलांसाठी ? धक्कादायक आकडे आले समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19

Covid-19 पुरुषांसाठी जास्त घातक की महिलांसाठी? धक्कादायक आकडे आले समोर

कोरोना विषाणूसंदर्भात केलेल्या नव्या सर्वेक्षणात धक्कादायक दावे समोर आले आहेत. सर्वेक्षणानुसार, लाँग कोरोना पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक ठरला आहे. यूएस सेन्सस ब्युरो आणि नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्सच्या मते, 11 टक्के पुरुषांच्या तुलनेत 17 टक्क्यांहून अधिक महिलांना कोरोना संसर्ग झाला आहे. दोन आठवड्यांत 41 हजारांहून अधिक प्रौढांचे ऑनलाइन सर्वेक्षण करून हा डेटा गोळा करण्यात आला आहे.

कोरोनामध्ये (Corona) लोकांना कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर इतर अनेक लक्षणे जाणवतात. हे सहसा संसर्ग झाल्यानंतर चार आठवडे किंवा महिन्यानंतरही होऊ शकते. बरे झाल्यावर ही लक्षणे परत येऊ शकतात.

  • महामारीदरम्यान 3.6 दशलक्ष लोकांना त्रास झाला

सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील 3.6 दशलक्ष लोकांना कोरोना महामारीदरम्यान लाँग कोरोनाची समस्या निर्माण झाली. सध्या 1.8 कोटी म्हणजेच 7 टक्के लोक लाँग कोरोनाने बाधित आहेत. पुरुषांमध्ये 1.3 टक्के तर 2.4 टक्के महिलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली, ज्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामांवर होत होता. याचा अर्थ पुरुषांपेक्षा महिलांसाठी कोरोना घातक ठरला आहे.

हेही वाचा: Blood Donation: रुग्णासह रक्तदान करणाऱ्यांनाही होतात मोलाचे फायदे

87 टक्के लसीकरण झाले नाही

ब्रुकिंग्स संस्थेच्या मते, अमेरिकेतील (America) किमान 4 दशलक्ष लोक दीर्घकाळापर्यंत संसर्गामुळे काम करू शकत नाहीत. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, महिलांमध्ये (Women) लॉंग कोरोना अधिक सामान्य आहे. महामारीतून बरे झाल्यांपैकी सुमारे 18 टक्के महिला होत्या, ज्यांना दोन महिन्यांहून अधिक काळ कोरोनाची लक्षणे होती, तर पुरुषांची संख्या केवळ 10 टक्के नोंदवली गेली. अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्यांना लॉंग कोरोना आहे त्यापैकी 87 टक्के लोकांचे लसीकरण झाले नव्हते.

  • 44 पेक्षा जास्त डेटाबेसचा अभ्यास केला आहे.

महामारीच्या काळापासून भारतातील सुमारे 40 दशलक्ष लोकांमध्ये लाँग कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. संशोधकांनी 44 पेक्षा जास्त ग्लोबल स्टडी आणि मेडिकल रेकॉर्ड डेटाबेस आणि 204 देशांमधील ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अभ्यासातून (Study) डेटा गोळा केला.जागतिक स्तरावर, 2020 आणि 2021 मध्ये 14.47 दशलक्ष लोक प्रभावित झाले आहेत.