Breakup नंतर सर्वाधिक इमोश्नल कोण होतं? मुलं की मुली; वाचा काय सांगतं रिसर्च

ब्रेकअपनंतर अनेकजण भावनिक होतात किंवा डिस्टर्ब होतात.
Breakup
Breakup Sakal

Breakup Side Effect On Bayes : ब्रेकअपनंतर अनेकजण भावनिक होतात किंवा डिस्टर्ब होतात. हे आपण अनुभवलं असेल किंवा इतर कुणाला त्या फेजमधून जाताना पाहिले असेल.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

Relationship breakup
Relationship breakup Relationship

आतापर्यंत ब्रेकअपनंतर तुम्ही मुली अधिक भावनिक होतात असं ऐकलं असेल, मात्र, ब्रेकअपनंतर मुली नव्हे तर, मुलं अधिक भावनिक होतात असे समोर आले आहे. जर्नल ऑफ सोशल अँड पर्सनल रिलेशनशिपमधील संशोधनाच्या निकालातून हे समोर आले आहे.

Breakup
Ginger In Tea : फक्कड चहासाठी नेमकं आलं टाकायचं कधी? पाणी गरम झाल्यावर की, उकळी आल्यावर

लँकेस्टर विद्यापीठाशी संबंधित संशोधकांच्या नेतृत्वाखाली मानसशास्त्रज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने हे संशोधन केले आहे. नातेसंबंधाशी संबंधित समस्यांवरील करण्यात आलेले अशा प्रकारचे हे पहिले मोठे डाटा विश्लेषण असल्याचे मानले जात आहे.

करण्यात आलेल्या या संशोधनात एक लाखाहून अधिक लोकांना सहभागी करण्यात आले होते असे संशोधनाचे प्रमुख शार्लोट एंटविसल यांनी सांगितले. या संशोधनात प्रत्येक व्यकीच्या नातेसंबंधात आलेल्या प्रत्येक समस्यांचा अभ्यास तसेच त्या जाणून घेण्यााचा प्रयत्न करण्यात आला.

Breakup
Viral: ब्रेकअप झालेल्यांसाठी खास ऑफर, बेवफा चायवाला देतोय डिस्कांउटमध्ये चहा

ब्रेकअपचा पुरुषांवर होणारा परिणाम

करण्यात आलेल्या या अभ्यासादरम्यान, नातेसंबंधांमध्ये संवादाशी संबंधित समस्या आघाडीवर होत्या. यात 5 पैकी 1 व्यक्तीने संवादाशी संबंधित समस्या मांडली. तर, 8 पैकी 1 व्यक्तीने त्यांच्या नात्यातील विश्वासाशी संबंधित समस्यांबद्दल भाष्य केले.

संशोधनादरम्यान, महिला आणि पुरुषांमधील भावनिक गोष्टींटाही अभ्यास करण्यात आला. त्यात असे दिसून आले की, स्त्रीयापेक्षा पुरुषांवर ब्रेकअप होण्याचा अधिक परिणाम होतो. एवढेच नव्हे तर, ब्रेकअपचा परिणामही स्त्रीयांच्या तुलनेत पुरूषांवर होतो हे यातून समोर आले.

Breakup
प्रियकरासोबत ब्रेकअप केल्यानंतर होणारे फायदे

संशोधनादरम्यान, पुरुषांनी स्त्रियांच्या तुलनेत ब्रेकअप घटनांबाबत अधिक भाष्य केले. तसेच या फेजमधून जाताना स्त्रियांच्या तुलनेत याचा परिणाम पुरूषांवर अधिक खोल झालेला होता. त्यामुळे स्त्रियांच्या तुलनेत पुरूषांवर ब्रेकअपचा परिणाम अधिक होतो हे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com