Signs Of Lucky Women : महिलांच्या शरीरावरील खुणा सांगतात की त्या तुमच्यासाठी आहेत Lucky Women

तुमच्या आयुष्यातली ‘ती’ आहे का Lucky
Signs Of Lucky Women
Signs Of Lucky Womenesakal

Signs Of Lucky Women : एखाद्या महिलेच्या शरीरावर स्पेसिफीक खुण असते. काहींच्या चेहऱ्यावर मोठा मस्सा असणे. काहींची बोटे लांब असणे हे शुभ असते. तुमच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीच्या शरीराची रचना कशी आहे. त्याबद्दल समुद्रशास्त्र काय सांगतं याबद्दल आज माहिती घेऊयात.

समुद्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात लोकांच्या हाताच्या रेषांव्यतिरिक्त त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर बनवलेल्या खुणा आणि पोत पाहून त्यांचा स्वभाव आणि इतर वैशिष्ट्ये निश्चित केली जाऊ शकतात. तसेच व्यक्तीच्या शरीरावर बनवलेल्या काही खास खुणा या बाबतीत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

Signs Of Lucky Women
Body Massage Benefits : मसाज केल्यानं मिळतात हे आरोग्यदायी लाभ, शरीरासोबत मनही होतं शांत!

आज आम्ही तुम्हाला अशा काही तीळ, खुणा इत्यादींबद्दल सांगणार आहोत जे महिला किंवा मुलींना खूप भाग्यवान आणि श्रीमंत बनवतात. असे म्हटले जाते की ज्या स्त्रियांच्या शरीरावर अशा खुणा असतात त्यांना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया महिलांच्या शरीरात आढळणाऱ्या काही खास प्रकारच्या खुणांबद्दल.

लकी मुलींची ओळख

पायाचे तळवे

आपल्या शरीरावर अनेक बारीक रेषा असतात. त्यांची योग्य ओळख पटवून समोरील व्यक्तीबद्दल माहिती मिळवता येते. तुमच्यासाठी लकी असलेल्या स्त्रीच्या पायाच्या तळव्यावर शंख, कमळ किंवा चक्र असते त्यांना खूप भाग्यवान मानले जाते. अशा स्त्रिया आपल्या कुटुंबाचे नाव तर उंचावतातच पण समाजात सन्मानही मिळवतात.

बोटे रूंद असतात

मानवी शरीराची प्रत्येक व्यक्तीची रचना वेगळी आहे. काहींचा चेहरा अगदी विचित्र असतो. तर काहींचा अगदी रेखीव असतो.शास्त्रानुसार ज्या स्त्रियांची बोटे गोल आणि रुंद असतात त्या अतिशय भाग्यवान असतात. असे म्हणतात की अशा स्त्रिया ज्या घरात जातात ते घर धन आणि आनंदाने भरलेले असते.

Signs Of Lucky Women
Body Building Women: थायरॉईडच्या व्याधीमुळे ही आई जीममध्ये गेली अन् झाली बॉडी बिल्डिंगची राष्ट्रीय चॅम्पियन!

मान लांब असणे

असे म्हटले जाते की, ज्या स्त्रियांची मान लांब असते. त्या खूप भाग्यवान असतात. त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप मान सन्मान मिळतो, त्यांना खूप लोकप्रियता, प्रसिद्धी मिळते. लग्नानंतर ती ज्या घरात जाते, ते ही आनंदाने आणि सौभाग्याने भरलेले असते.

हाताची बोटे लांब असणे

ज्या स्त्रियांच्या हातात लांब बोटे असतात अशा स्त्रिया आपल्या पतीवर खूप प्रेम करतात. ते आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात. त्यांच्या पतीला नोकरी-व्यवसायात बरीच प्रगती मिळते. अशा महिलांना त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा त्रास होत नाही.

कपाळावरील चिन्ह 

ज्या स्त्रियांच्या कपाळावर त्रिशूळाचे चिन्ह असते, अशा स्त्रियांना जीवनात अपार संपत्ती मिळते. ते जिथे जातात तिथे सुख, समृद्धी आणि आनंद त्यांच्यासोबत असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com