- अक्षया हिंदळकर आणि विनेश निन्नुरकर
‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतून एकत्र आलेले अक्षया हिंदळकर आणि विनेश निन्नुरकर यांचं नातं आज खूप खास मैत्रीत रूपांतरित झालं आहे. सुरुवातीला ‘जमेल का आपलं?’ असा प्रश्न मनात असतानाच, आज ते दोघंही एकमेकांना अतिशय जवळचं मानतात. स्क्रीनवरच्या भूमिकेपलीकडे या दोघांनी ऑफ-स्क्रीन एक सुंदर बंध निर्माण केलाय. ज्यात हास्य आहे, मस्ती आहे आणि सच्चा विश्वाससुद्धा!