skin care
skin caresakal

Skin care : निरोगी त्वचेसाठी आहारात करा हे बदल; वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला

वनस्पती-आधारित आहार शरीराला व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि सेलेनियम प्रदान करतो, जे वृद्धत्व कमी करते तसेच नवीन पेशींना चालना देतात.

मुंबई : जेव्हा सौंदर्याचा विचार केला जातो तेव्हा सर्वांत महत्त्वाची गोष्ट जी भूमिका बजावते ती म्हणजे त्वचेचे स्वरूप. यामुळेच लोक आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी भरपूर पैसे खर्च करतात. यातील काही रक्कम क्रीम्सवर, तर काही सौंदर्य उपचारांवर खर्च केली जाते. मात्र, सत्य हे आहे की जोपर्यंत आहाराच्या सवयी बदलल्या जात नाहीत, तोपर्यंत निर्दोष त्वचेचे स्वप्न साकार होणे कठीण आहे.

skin care
नखांची काळजी घेताना या चुका टाळा

आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी या संदर्भात एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी ग्लोइंग स्किनसाठी काय खावे आणि काय नाही हे शेअर केले आहे. यासोबतच त्यांनी आणखी काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. या डाएट टिप्स अशा आहेत की आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवणे फार कठीण नाही.

skin care
Beauty tips : दुधापासून तयार करा हेयर मास्क

आपल्या पोस्टमध्ये, पोषणतज्ज्ञांनी लिहिले आहे की, 'आपल्या त्वचेमध्ये स्वतःला टवटवीत करण्याची शक्ती आहे. वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या आणि डाग दिसू लागतात. दिसण्याबरोबरच त्वचेचा पोतही बदलू लागतो. कालांतराने, त्वचेची स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते. म्हणूनच आपण दररोज आपल्या त्वचेची थोडी अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

अंजली मुखर्जी यांनी रोज एक ग्लास भाज्यांचा रस पिण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की गाजर, टोमॅटो आणि बीटरूटचा रस त्वचा आणि यकृतातील विषारी पदार्थ साफ करतो. वनस्पती-आधारित आहार शरीराला व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि सेलेनियम प्रदान करतो, जे वृद्धत्व कमी करते तसेच नवीन पेशींना चालना देतात.

पोषणतज्ज्ञांनी लोकांना धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. यासोबतच तळलेले आणि जास्त तिखट पदार्थ न खाण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ते विषारी पातळी खूप वाढवतात, जे शरीर आणि त्वचेसाठी चांगले नाही.

अंजली मुखर्जी फॅट्सचे सेवन कमी करण्याचा सल्ला देतात. यासोबतच ग्लोइंग स्किनसाठी हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ आहारात वाढवावेत, असे त्यांनी सांगितले आहे. यामध्ये विशेषत: मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि ओमेगा फॅटी अॅसिड जसे की फिश ऑइल, ऑलिव्ह ऑइल, कॅनोला ऑइल आणि अक्रोड्स यांचा समावेश होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com