Body Scrub : चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा बॉडी स्क्रब, चेहरा दिसेल सुंदर, जाणून घ्या पध्दत!

तुम्ही बॉडी स्क्रब वापरणे गरजेचे आहे. ते बाजारातून विकत घेण्याऐवजी तुमच्या घरी असलेल्या वस्तूंनी तयार करा.
Body Scrub
Body Scrubsakal

चेहऱ्यावर डाग दिसू लागताच आपण ताबडतोब पार्लर किंवा डॉक्टरांकडे जातो, जेणेकरून आपण चांगले उपचार करून या सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकतो. पण चेहऱ्यासोबत तुमच्या शरीराचीही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही बॉडी स्क्रब वापरणे गरजेचे आहे. ते बाजारातून विकत घेण्याऐवजी तुमच्या घरी असलेल्या वस्तूंनी तयार करा. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल. तसेच, तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.

बॉडी स्क्रबसाठी लागणारे साहित्य

 • लिंबाची साल - 3 ते 4

 • गरम पाणी - 1 कप

 • मुलतानी माती - 2 चमचे

 • बेसन - 1 चमचा

 • गुलाब पाणी - 2 ते 3 थेंब

बॉडी स्क्रब कसा बनवायचा

 • यासाठी प्रथम मुलतानी माती भांड्यात रात्रभर भिजवावी.

 • नंतर लिंबाची साल गरम पाण्यात काही वेळ भिजवावी.

 • नंतर मिक्सरमध्ये पाणी टाकून हे बारीक करून घ्या.

 • आता आपल्याला काचेचे भांडे घ्यावे लागेल. त्यात ही लिंबाची पेस्ट टाकायची आहे.

 • यानंतर त्यात मुलतानी माती घालावी. नंतर बेसन मिक्स करावे.

 • सुगंधासाठी त्यात गुलाबजल टाकावे लागेल.

Body Scrub
Skin Care Tips : सुरकुत्या, पिंपल्स आणि टॅनची समस्या दूर करण्यासाठी लिंबू आहे फायदेशीर... अशा प्रकारे करा वापर

अशा प्रकारे बॉडी स्क्रब वापरा

 • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे शरीर स्वच्छ करावे लागेल.

 • हा बॉडी स्क्रब संपूर्ण शरीरावर लावावा.

 • यानंतर हलक्या हातांनी स्क्रब करा. 30 मिनिटे तसेच ठेवा.

 • त्यानंतर बॉडी स्क्रब पाण्याने स्वच्छ करावा.

 • यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल.

Shabda kode:

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com