
सुंदर चेहरा हा स्त्रीचा आरसाच असतो. चेहऱ्यावर पडणारा प्रत्येक डाग, पिम्पल्स हे स्त्रीला अथवा मुलींना नको असतात. स्वच्छ आणि तुकतुकीत असा चेहरा निरोगी आरोग्याची खून देतात.
कोल्हापूर : सुंदर चेहरा हा स्त्रीचा आरसाच असतो. चेहऱ्यावर पडणारा प्रत्येक डाग, पिम्पल्स हे स्त्रीला अथवा मुलींना नको असतात. स्वच्छ आणि तुकतुकीत असा चेहरा निरोगी आरोग्याची खून देतात.आज कालच्या कामामुळे, ड्रेस मुळे चेहऱ्यावरती वांग उठणे,सुरकुत्या पडणे अशा खूप साऱ्या समस्य खूप महिलांना तोंड द्यावे लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यामुळे चेहऱ्याची चमक तर कमी होतेच शिवाय तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप कमी होतो. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. सुरकुत्या पडण्यापासून आपण थांबू शकतो तुम्ही विचार करत असाल की त्याच्यासाठी खूप महाग अशी ट्रीटमेंट असेल. पण असं अजिबात नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्याचं अनुकरण करणे खूप कठीण नाही . आणि याच्यासाठी जास्त वेळही खर्च करावा लागणार नाही.
करा स्किन एक्सफोलिएशन
चेहऱ्यासाठी एक्सफोलिएशन खूप महत्त्वाचं असते. कारण तुमच्या त्वचेला सॉफ्ट बनवण्यासाठी ते मदत करतात. लक्षात घ्या की प्रत्येक आठवड्याला चेहऱ्याला एक्सफोलिएशन किंवा स्क्रब करा. यासाठी तीन टेबलस्पून साखर, एक टेबलस्पून मध घेऊन मिश्रण तरा करा.या मिश्रणाने चांगला स्क्रबिंग करून घ्या चेहऱ्याला अशा कारणांमुळे चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल चेहरा विना डागाचा दिसेल.
हेही वाचा- लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठी या आयुर्वेदिक जडीबुटीचा करा वापर
डायट असेल खास
सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठी रोज सकाळी एक बाऊल मोड आलेले हरभरे आणि मुग खान्यामध्ये समावेश डायट मध्ये करा .यामुळे विटामिन ई मिळेल जे तुमच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत करेल आणि चेहरा टवटवीत बनवेल.
त्वचा निर्जन दिसत असेल तर हे करा
चेहऱ्याला सतेज ठेवण्यासाठी चांगला पर्याय असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या.कमी पाणी पिल्यामुळे शरीराला आतूनच कोरडेपणा येतो आणि आपली स्किन लूज पडते. ज्यामुळे सुरकुत्यांचे प्रमाण जास्त वाढण्यास सुरुवात होते. यासाठी नियमितपणे रोज कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी प्या.
हेही वाचा-काॅम्प्यूटर पेक्षा जास्त चालेल तुमची बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्तीत होईल वाढ ; डायटमध्ये समावेश करा या आठ गोष्टीं
मॉइश्चरायझर लावा
कोरडी आणि डाग रहित त्वचा कोणालाही आवडत नसते यासाठी त्वचेवर नियमित मॉयस्चराइज़र असणे गरजेचे आहे. लक्षात घ्या की ऑलिव्ह ऑइल, नारळाचं तेल किंवा मॉयस्चराइज़र नेहमी वापरत रहा.
एक टीस्पून तेल घ्या या मिश्रणाने चेहर्या पासून मानेपर्यंत मसाज करा असे नियमितपणे करा.काही दिवसाने तुम्हाला स्वतःलाच यामध्ये फरक जाणवेल.