
Sleep Duration Time : झोप उडवणारं वय; स्टडीतून समोर आली महत्त्वाची माहिती
People Sleep Duration Time : तारूण्यात झोपेचे प्रमाण अधिक असते, तर वयोमानानं हळू-हळू झोप कमी कमी होत जाते.
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
हेही वाचा: Viral Video : झोप पिल्ल्या झोप! बाळाला गिटारवर झोपवत बापाने गायली लेकासाठी लोरी
तज्ज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या एक स्टडीतून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या अभ्यासात नेमकी कोणत्या वयापासून झोप कमी होण्यास सुरूवात होते याबाबात खुलासा करण्यात आला आहे.
हे संशोधन ब्रिटनच्या यूसीएल, ईस्ट अँग्लिया युनिव्हर्सिटी आणि फ्रान्सच्या लियॉन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संयुक्तपणे केले असून, नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
या स्टडीमध्ये ६३ देशांतील ७.३० लाखांहून अधिक व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. ३३ ते ५३ वयोगटातील लोकांना कामाचे आयुष्य आणि मुलांची काळजी यामुळे कमी झोप लागते असेही अभ्यासात नमुद करण्यात आले आहे.
हेही वाचा: Health Tips For Winter : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी अंघोळीचे पाणीच करेल मदत!
३३ ते ५३ वयोगटातील लोक कमी झोपतात
ANI च्या रिपोर्टनुसार, वयाच्या ३३ वर्षानंतर अनेकांची झोप कमी होण्यास सुरूवात होते, तर वयाच्या ५३ वर्षांनंतर झोप वाढण्यास सुरूवात होत असल्याचे स्टडीत नमुद करण्यात आले आहे.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ३३ ते ५३ वर्षे वयोगटातील व्यक्ती प्रौढत्वाच्या सुरुवातीच्या आणि उतार वयाच्या तुलनेत व्यक्ती मध्य प्रौढावस्थेत कमी झोपतात.
स्टडीत सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये पुरुषांची सरासरी झोप ७.०१ तास होती, तर महिलांची सरासरी झोप ७.५ तास असल्याचे समोर आले.
तर, सहभागी १९ वर्षांच्या व्यक्ती सर्वाधिक झोपतात आणि वयाच्या ३० व्या वर्षानंतर झोप कमी होऊ लागल्याचे आणि वयाच्या ५३ वर्षांनंतर पुन्हा झोप वाढल्याचे आढळून आले.
हेही वाचा: जेवणानंतर लगेच झोप नको; आरोग्यासाठी अत्यंत घातक
विविध देश आणि प्रदेशानुसार लोकांच्या झोपेचा कालावधी वेगवेगळा असतो. काही प्रदेशातील लोकांना जास्त झोप लागली तर, काहींना कमी झोप लागली.
पूर्व युरोपीय देश जसे की, अल्बेनिया, स्लोव्हाकिया, रोमानिया आणि झेक प्रजासत्ताक यांसारख्या दक्षिणपूर्व आशियाई देशांतील लोकांपेक्षा फिलीपिन्स, मलेशिया आणि झेक प्रजासत्ताक या भागातील व्यक्ती साधारण २० ते ४० मिनिटे जास्त झोपले.
तर, इंडोनेशिया, युनायटेड किंगडममधील लोकांनी सरासरीपेक्षा कमी झोप घेतली.