Sleep Tips: एका चुटकीत येईल झोप, फक्त '4-7-8' ची 'ही' ट्रीक वापरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sleep Tips

Sleep Tips: एका चुटकीत येईल झोप, फक्त '4-7-8' ची 'ही' ट्रीक वापरा

Sleeping Tips: अलीकडे धावपळीच्या काळात लोक कामाच्या नादात झोपेकडे दूर्लक्ष करतात आणि मग त्याचं संपूर्ण आरोग्यच गडबडू लागतं. अनेकजण हल्ली झोपेच्या समस्येने ग्रासलेले आहेत. जर तुमच्या डोळ्यांत झोप नसेल तर खरंच चिंतेचा विषय आहे. झोप न येणे तुम्हाला डायबिटीज, लठ्ठपणा, हृदयविकार, अल्जायमर आणि डिप्रेशन यांसारख्या समस्यांकडे खेचू शकते.

झोप न येण्याची कारणे

हल्ली जास्तीत जास्त लोक झोप न येण्याच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. तुमच्या कामाचा ताण हे झोप न येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीचं टेंशन घेतल्यास कार्टिसोल हार्मोनचं स्तर वाढतं. आणि झोपेच्या अडचणी उद्भवतात. (Stress News) जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्यानेही झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही सकाळी उशिरा उठत असाल तर हेही तुम्हाला झोप न येण्याचं महत्वाचं कारण ठरतं.

हेही वाचा: Sleep : संध्याकाळी झोपणारे 'या' तीन देवींच्या आशीर्वादापासून राहतात वंचित

तुमच्यातला आळसही झोप न येण्याचं कारण ठरतं. जर तुम्ही दिवस बसले असाल आणि काहीच काम करत नसाल तर तुम्हाला झोप येणं अशक्य आहे.

झोपेसाठी 4-7-8 ही युनिक ट्रीक

1. झोपेच्या समस्या दूर करण्याची 4-7-8 मेथड मेडिटेशनसारखी आहे. ही मेथड करण्यासाठी 2. आधी तुमची जीभ वर करा आणि दाताच्या मागच्या बाजूला क्लिक करा.

3. आता चार वेळा नाकाने श्वास घ्या.

4. यानंतर सात सेकंदापर्यंत तुमचा श्वास रोकून ठेवा.

5. ही प्रक्रिया चार ते पाच वेळा करा.

हेही वाचा: Sleeping Tips: कोणत्या अवस्थेत झोपणे असते चांगले;वाचा काय म्हणतात एक्सपर्ट्स?

हे रोज केल्याने झोपेच्या समस्या दूर होतात. जर तुमची रात्री झोप मोड झाली तर ही ट्रीक तुम्हाला झोप लवकर येण्यास मदत होईल.