Sleep : संध्याकाळी झोपणारे 'या' तीन देवींच्या आशीर्वादापासून राहतात वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sleep

Sleep : संध्याकाळी झोपणारे 'या' तीन देवींच्या आशीर्वादापासून राहतात वंचित

Evening Sleep : हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीत दिवसभर दमल्यावर संध्याकाळी काही जण झोपतात. मुले दुपारी खेळण्यात किंवा इतर गोष्टीत वामकुक्षी घेणे टाळतात मग संध्याकाळीच झोपतात. अशावेळी आपली आई-आजी लगेच म्हणते, संध्याकाळी झोपू नये. आपल्या जीवनाशी संबंधित अशी अनेक कामे सांगितली आहेत, जी काही विशिष्ट दिवशी किंवा वेळी करणे निषिद्ध मानले जाते. तुम्ही कधी विचार केला आहे का की, संध्याकाळी झोपण्यास मनाई का आहे?

हेही वाचा: तुमचे Sleep Routine खराब झालंय? 'या' गोष्टी माहित असणे गरजेचे!

धार्मिक कारणे

धार्मिक शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळचा वेळ अत्यंत शुभ मानला जातो, कारण सकाळ ही देवाची पूजा करण्याची वेळ असते. त्याचबरोबर संध्याकाळची वेळ आत्मनिरीक्षणासाठी फायदेशीर मानली जाते. संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि माता दुर्गा या तीन देवी आपल्या घरी येतात, असे शास्त्रात सांगितले आहे. या दरम्यान जर एखादी व्यक्ती झोपत असेल तर तो या तीन देवींच्या आशीर्वादापासून वंचित राहतो. संध्याकाळच्या वेळी न झोपण्याचे धार्मिक शास्त्रांमध्ये हे सर्वात मोठे कारण आहे.

हेही वाचा: Sleep Routine : साडेसहा तासांपेक्षा जास्त झोपत असाल तर सावधान!

देवी लक्ष्मी क्रोधित होते

धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळी घराचे दरवाजे उघडे ठेवून देवी लक्ष्मीचे स्वागत केले जाते. जर संध्याकाळच्या वेळी तुमच्या घराचे दरवाजे बंद असतील तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करू शकणार नाही, यामुळे ती तुमच्यावर नाराज होऊ शकते. तसेच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल.

हेही वाचा: Sleeping Problems During Work: ऑफिसमध्ये झोप येऊ नये म्हणून काय करावे?

सूर्य देवाशी संबंध

ज्याप्रमाणे आपला दिवस सूर्योदय होताच सुरू होतो आणि आपण दिवसभर ऊर्जेने काम करतो. त्याचप्रमाणे सूर्यास्त होताच आपण नवीन योजना तयार करू लागतो. जर आपण संध्याकाळी झोपलो तर आपण भविष्यासाठी नियोजन करू शकत नाही, ज्यामुळे आपली अनेक कामे बिघडू शकतात आणि आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागू शकते.

हेही वाचा: Sleeping Record : ऐकावं ते नवलच! भारतीय मुलीने झोप काढून जिंकले लाखो रुपये

शास्त्रीय कारणे

वैद्यकीय शास्त्रानुसार, जर तुम्ही संध्याकाळी झोपलात तर तुमचे संपूर्ण जीवन चक्र विस्कळीत होते, ज्यामुळे रात्रीची झोप देखील शांत होत नाही. बहुतेक लोक संध्याकाळपर्यंत आपले काम संपवतात, परंतु संध्याकाळी झोपल्यामुळे आपली कामे उशिराने पूर्ण होतील. ती संपवताना मग रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागते. रात्री उशिरा झोपल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो, ज्याचा आपल्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. संध्याकाळच्या झोपेमुळे झोपेचे चक्रही बिघडते, जे अनेक आजारांना आमंत्रण देते.

Web Title: Evening Sleep Bad Habit Keeps You Away From These Three Goddesses Blessings

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sleep