Useful Mobile Apps: तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत 'हे' अ‍ॅप्स, मिनिटात होतील अनेक कामं

अगदी जेवण ऑर्डर करण्यापासून ते पैसे पाठवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी फोनमध्ये अ‍ॅप्स असतात. मात्र काही असे अ‍ॅप्स आहेत, जे तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत.
most useful android apps in daily life
most useful android apps in daily lifeSakal

Most useful apps for Android: आज स्मार्टफोनमध्ये प्रत्येक कामासाठी वेगवेगळे अ‍ॅप्स उपलब्ध असतात. अगदी जेवण ऑर्डर करण्यापासून ते पैसे पाठवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी फोनमध्ये अ‍ॅप्स असतात. मात्र काही असे अ‍ॅप्स आहेत, जे तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत. हे अ‍ॅप्स डेली अ‍ॅक्टिव्हिटी आणि स्टोरेज मॅनेजमेंटसाठी खूपच उपयोगी येतील. या अ‍ॅप्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

most useful android apps in daily life
Tecno Phone: सर्वात पॉवरफुल प्रोसेसरसह TECNO च्या फोनची भारतात एंट्री, फीचर्स खूपच जबरदस्त; पाहा किंमत

Google Files

गुगलचे हे अ‍ॅप खूपच कामाचे आहे. याद्वारे तुम्ही फाइल ट्रान्सफर, फाइल ब्राउजसह स्टोरेज मॅनेजमेंट करू शकता. तुमच्या अँड्राइड डिव्हाइससाठी हे ऑल इन वन अ‍ॅप आहे. मोठ्या साइजच्या फाइल दुसऱ्या डिव्हाइसमध्ये शेअर करण्यासाठी या अ‍ॅपचा खूपच उपयोग होईल. याशिवाय, याद्वारे तुम्ही अनावश्यक फाइल्स देखील डिलीट करू शकता.

Internet Speed Meter

अनेकदा मोबाइलमधील इंटरनेटचा स्पीड खूप कमी असतो. अशावेळी तुम्ही Internet Speed Meter Lite अ‍ॅपच्या मदतीने डेटा स्पीडबाबत जाणून घेऊ शकता. हे इंटरनेट स्पीडपासून ते डेटा कंझम्पशनची माहिती देते. तुम्ही जर कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन घेतला असल्यास अशावेळी डेटा मॅनेजमेंटसाठी याची मदत होईल.

हेही वाचा: Smartphone Tips: वारंवार फोन चार्ज करावा लागतोय? बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Keep Notes

गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असलेले Keep Notes खूपच कामाचे आहे. याचा उपयोग तुम्ही डिजिटल डायरी म्हणून करू शकता. तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी यात नमूद करू शकता. यात चेक लिस्टचा देखील पर्याय मिळतो. एखादी यादी तयार करायची असल्यास याचा उपयोग येईल. Keep Notes मध्ये तुम्हाला इतरही शानदार फीचर्स मिळतील.

Hammer Security App

Hammer Security App च्या मदतीने तुम्ही चोरी झालेल्या फोनला ट्रॅक करू शकता. अ‍ॅपला गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येईल. अ‍ॅपमध्ये डमी स्विच ऑफ, फेक फ्लाइड मोड सारखे फीचर्स दिले आहेत. चोराने डिव्हाइसला स्विच ऑफ अथवा फ्लाइड मोड करण्याचा प्रयत्न केल्यास फोन डमी स्विच ऑफ होईल व चोराचा फोटो देखील कॅप्चर करेल. अ‍ॅप चोराचा ऑडिओ आणि लोकेशन देखील रेकॉर्ड करते.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com