Mobile Games De-Addiction Tips: 'गेमिंग'च्या जाळ्यात अडकलंय का तुमचं मूल? मग जाणून घ्या व्यसन मोडण्याचे स्मार्ट उपाय
थोडक्यात:
मोबाईल गेम्सचं व्यसन शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतं.
स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवणं, पर्यायी छंद लावणं आणि संवाद वाढवणं हे उपाय उपयुक्त ठरतात.
अत्यधिक व्यसन दिसल्यास तज्ज्ञांची मदत घेणं ही काळाची गरज आहे.
How to Prevent Mobile Gaming Addiction in Children: सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. अशातच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाइलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्वीट केला आहे. यानंतर मंत्री कोकाटेंवर अनेक टीका झाल्या असून एकच मुद्दा ठळक झाला आहे, तो म्हणजे सगळ्याच वयोगटांमध्ये मोबाईल गेम्सचं वाढतं व्यसन आणि वेड. त्यातही या ग्रुपमध्ये लहान आणि शाळकरी मुलांचा जास्त संख्येने समावेश आहे.
मग हे व्यसन घालवायचं कसं, मुलांना दुसऱ्या अॅक्टिव्हिटिजची आवड कशी निर्माण करायची असे प्रश्न सगळ्याच पालकांना पडतात.
आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर करणे म्हणजे केवळ खेळ खेळणे किंवा इन्स्टाग्राम स्क्रोल करणे एवढेच मर्यादित राहिलेले नाही.मोबाईलचा वापर त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा मोठा भाग बनला आहे – पण याच अतिरेकामुळे, अनेक वेळा मुलांना स्वतःलाही जाणवत नाही की ते मोबाईलच्या आहारी गेले आहेत. सुरुवातीला निरुपद्रवी वाटणारा हा सवयीचा भाग हळूहळू व्यसनात बदलतो आणि त्याचे परिणाम त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आरोग्यावर खोलवर उमटायला लागतात.
मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मुलांमध्ये नैराश्य, चिंता, एकटेपणा, डोकेदुखी, डोळ्यांवरील ताण, मान आणि पाठदुखी अशा समस्या निर्माण होतात. याव्यतिरिक्त, ही सवय त्यांच्या सामाजिक आयुष्यालाही बाधा आणते.
मुलांचं मोबाईल गेम्सचं व्यसन थांबवण्यासाठी काही प्रभावी उपाय:
१. स्क्रीन टाईमवर मर्यादा घालणे
अनेक पालकांना आपल्या मुलांनी मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवणं चिंताजनक वाटतं. सोशल मीडिया, गेम्स यामधील व्यसनामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. म्हणून त्यांच्या मोबाईल वापरावर निश्चित वेळेची मर्यादा ठेवा.
यासाठी आपण खालील गोष्टी करू शकता:
दररोज ठराविक वेळानंतर मोबाईल बाजूला ठेवण्याची सवय लावा. हा नियम कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला लागू करा.
संध्याकाळी मोबाईलमुक्त तास ठरवा, जिथे सगळं कुटुंब एकत्र वेळ घालवेल.
स्वतःही मोबाईलचा मर्यादित वापर करून त्यांना चांगलं उदाहरण द्या.
२. पर्यायी छंद आणि क्रियाकलापांवर भर द्या
मोबाईलमधून मिळणाऱ्या क्षणिक आनंदाला पर्याय म्हणून मुलांना खेळ, वाचन, चित्रकला, संगीत, नृत्य असे विविध छंद लावून द्या.
परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी आठवड्यातून एकदा 'फॅमिली नाईट' ठरवा.
आउटडोअर खेळ, सायकलिंग किंवा ट्रेकिंगसारख्या गोष्टींमध्ये सहभाग घ्या.
मोबाईल नसलेले खेळ शिकवा – बुद्धिबळ, लुडो, कॅरम इ.
३. व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगा
मोबाईलचा अति वापर मुलांच्या झोपेवर, एकाग्रतेवर आणि सामाजिक संवादावर परिणाम करतो.
त्यांना हे समजावून सांगा की स्क्रीनसमोरील वेळ वाढला की डोळ्यांवर ताण येतो.
सतत मेसेजेस, व्हिडिओ बघणं यामुळे मेंदूचा नैसर्गिक विश्रांतीचा वेळ बिघडतो.
वास्तविक आयुष्यातील संवाद, मैत्री, आणि शिकण्याचा अनुभव त्यांना द्या.
४. रात्री मोबाईल वापरण्यावर बंदी
झोपेपूर्वी मोबाईल वापरणं झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करते.
ठराविक वेळेनंतर (उदा. रात्री ९ वा.) मोबाईल बाजूला ठेवण्याचे नियम करा.
झोपेच्या वेळेस मोबाईल पूर्णपणे बंद केल्यास झोप उत्तम होते.
रात्रीच्या जेवणाच्या दरम्यान मोबाईल न वापरण्याचा नियम संपूर्ण कुटुंबासाठी लागू करा.
५. गरज असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या
कधी कधी संवाद आणि नियम याही पलिकडची परिस्थिती निर्माण होते.
जर मुलाला मोबाईलशिवाय राहणं अशक्य वाटत असेल, तर बाल मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
ताण, चिंता, एकलकोंडेपणा यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
शाळेतील शिक्षक, समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञ यांच्याशी संवाद साधा.
FAQs
मी माझ्या मुलाचं मोबाईल गेम्सचं व्यसन कसं कमी करू शकतो/शकते? (How can I control my child's mobile gaming addiction?)
➤ स्क्रीन वेळेवर मर्यादा घालणे, मोबाईलमुक्त वेळ ठरवणे आणि पर्यायी खेळांमध्ये मुलांना गुंतवणे हा उत्तम उपाय आहे.माझ्या मुलाला मोबाईल गेम्सचं व्यसन लागलं आहे, हे ओळखायची चिन्हं कोणती?(What are the signs that my child is addicted to mobile games?)
➤ झोपेच्या वेळेत बदल, एकटेपणा, सतत स्क्रीनकडे बघत राहणं, आणि अभ्यासात रस न घेणं ही लक्षणं आहेत.मोबाईलचं व्यसन मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतं का? (Can mobile addiction affect a child's mental health?)
➤ होय, यामुळे मुलांमध्ये नैराश्य, चिंता, चिडचिड, आणि एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते.मुलाच्या मोबाईल व्यसनासाठी मला तज्ज्ञाची मदत केव्हा घ्यावी? (When should I consult a professional for my child’s mobile addiction?)
➤ जेव्हा घरातील नियम, संवाद आणि नियंत्रणाचा काही उपयोग होत नसेल, तेव्हा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.