Internet Addiction In Children: तुमचं मूल इंटरनेटच्या 'जाळ्यात' तर नाही ना?

How To Protect Kids From Internet Addiction: मुलांमध्ये इंटरनेटच्या आहारी जाण्याची लक्षणे, त्याचा त्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम आणि स्क्रीन टाइम नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त उपाय जाणून घ्या.
Internet Addiction In Children
Internet Addiction In Children sakal
Updated on

थोडक्यात:

  1. इंटरनेट आणि मोबाइलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक समस्यांमध्ये वाढ होत आहे.

  2. डोळ्यांवर ताण, अपुरी झोप, लठ्ठपणा आणि चिडचिडेपणा ही या व्यसनाचे काही मुख्य परिणाम आहेत.

  3. पालकांनी स्क्रीन टाइम नियंत्रित करणे, संवाद वाढवणे आणि मैदानावरचा वेळ वाढवणे हे प्रभावी उपाय ठरू शकतात.

Overuse Of Internet: हे युग इंटरनेटचे आहे. आज ‘फाइव्ह-जी’मुळे इंटरनेटचा अतिवापर वाढला आहे. यापुढे तो वाढतच राहणार आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाइलचे व्यसन लागले. मात्र, इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे त्याचे धोकेही हळूहळू लक्षात येत आहेत.

यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या उद्‍भवत आहेत. मोबाइल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या मनावरही दुष्परिणाम होत आहेत. यामध्ये डोळ्यांवर ताण, अपुरी झोप, लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहेत, असे निरीक्षण डॉ. जागृती तुषार निकम यांनी नोंदविले.

इंटरनेटच्या अतिवापराचे परिणाम

डोळ्यांवर ताण

इंटरनेटच्या सतत वापरामुळे डोळ्यांवर सर्वांत जास्त परिणाम होतो. डोळ्यांना विश्रांती न देता दीर्घकाळ इंटरनेट वापरल्यामुळे मुलांना डोकेदुखी, नजर कमी होणे अशा समस्या उद्‍भवतात.

अपुरी झोप

अनेक मुले रात्री उशिरापर्यंत मोबाइलमधील रील्स बघतात. यामुळे त्यांची झोप अर्धवट होते. अनियमित झोपेमुळे मुलांमध्ये शारीरिक समस्या उद्‍भवतात.

Internet Addiction In Children
Digital Parenting : AI दोस्त की धोका? स्मार्ट स्पीकर्सवर मुलांचा भावनिक विश्वास!

लठ्ठपणा

बहुतांश घरी लहान मुले जेवताना मोबाइल बघतात. मोबाइलमध्ये मग्न असलेली मुले गरजेपेक्षा जास्त अन्न खातात. अशामुळे लठ्ठपणा वाढतो.

बैठी जीवनशैली

मोबाइलच्या अतिवापरामुळे शारीरिक हालचाली होत नसल्याने मुलांमध्ये शारीरिक व्याधी उद्‍भवतात.

मानसिक आरोग्यावर परिणाम

इंटरनेटच्या अतिवापरामुळे लक्ष विचलित होते. मानसिक आरोग्य बिघडते. यामुळे मुलांचा चिडचिडेपणा वाढतो.

अनावश्यक माहिती

इंटरनेटवरील व्हिडिओ पाहिल्यामुळे नको ती माहिती मिळते. याचा मुलांच्या मनावर परिणाम होतो. त्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलित होते.

व्हिडिओ गेम्स

व्हिडिओ गेम्सच्या नादामुळे मुले व्हर्च्युअल जगात वावरायला लागतात. त्यांचा कुटुंबापासून संवाद तुटतो. यातूनच ते डिप्रेशनमध्ये जातात.

Internet Addiction In Children
Heart Attack in Children: 9 वर्षांच्या मुलीच्या हार्ट अटॅकने झालेल्या मृत्यूला सर्दी-खोकला कारणीभूत? वाचा संशोधन काय सांगते

असे करा उपाय

१. रात्री झोपताना मोबाइल बेडपासून लांब ठेवावा. लहान मुलांसमोर फोन हातात घेऊन बसू नये. रात्री मुलांच्या हातात मोबाइल देण्यापेक्षा त्यांना गोष्टी सांगा. ते लवकर झोपतात.

२. मुलांच्या वयानुसार त्यांचा स्क्रीन टाइम ठेवावा. दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल अजिबात देऊ नये. २ ते १० वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्धा तास मोबाइल देणे ठीक आहे.

३. मुले काय बघतात, याकडे पालकांचे लक्ष असायला हवे. लहान मुलांना पर्सनल मोबाइल घेऊन देऊ नये.

४. मुलांचे सोशल मीडियावरील अकाउंट आणि मेलचा पासवर्ड पालकांना माहीत पाहिजे. यावर पालकांचे नेहमी लक्ष असायला पाहिजे.

Internet Addiction In Children
Post C-Section Care Tips: सी-सेक्शन नंतर या ४ गोष्टी खाणं ठरू शकतं धोकादायक, जाणून घ्या योग्य आहार!

५. पालकांनी मुलांशी फ्रेंडशिप ठेवावी. त्यामुळे मुलांना पडलेले प्रश्न ते सहज पालकांना विचारू शकतील. त्या प्रश्नांचा शोध मुले इंटरनेटवर घेणार नाहीत. यातून इंटरनेटचा वापर कमी होऊन त्यांचा स्क्रीन टाइमही कमी होईल.

६. मुलांसोबत जास्त वेळ घालवावा. त्यांना मैदानावर घेऊन जावे. एखाद्या खेळाविषयी आवड निर्माण करून द्यावी. यामुळे साहजिकच मुले इंटरनेटचा वापर कमी करतील.

संकलन : बाळासाहेब खेडेकर

FAQs

  1. लहान मुलांमध्ये इंटरनेटच्या अतिवापरामुळे कोणत्या आरोग्य समस्या निर्माण होतात? (What are the major health issues caused by excessive internet use in children?)

    - डोळ्यांवर ताण, अपुरी झोप, लठ्ठपणा, चिडचिडेपणा, मानसिक अस्वस्थता, आणि एकाग्रतेचा अभाव अशा समस्या लहान मुलांमध्ये दिसून येतात.

  2. मुलांसाठी किती स्क्रीन टाइम योग्य आहे? (How much screen time is appropriate for children?)

    - दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल अजिबात देऊ नये. २ ते १० वयोगटातील मुलांना दररोज अर्धा तासापर्यंतच स्क्रीन टाइम ठेवावा.

  3. इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? (What are the psychological effects of internet overuse on kids?)

    - सतत इंटरनेट वापरामुळे मुलांचे लक्ष विचलित होते, चिडचिड वाढते, संवाद कमी होतो आणि काही वेळा नैराश्यही येऊ शकते.

  4. पालकांनी मुलांचा मोबाइल वापर कमी करण्यासाठी काय उपाय करावेत? (What can parents do to reduce their children's mobile addiction?)

    - पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा, त्यांचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवावा, मैदानावर खेळायला घ्यावे आणि त्यांच्या ऑनलाईन कृतीवर लक्ष ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com