Solo Travel: दडपण आणि दिलासाही

Fear and Courage Mark Her First Solo International Journey: नवरा आधी परतला, एकटीने प्रवास करण्याची वेळ आली; लंडन विमानतळावर मनात दडपण आणि धाकधूक
Travelling Alone From Britain to India Woman Faces Anxiety and Finds Courage During Her First Solo Overseas Journey

Travelling Alone From Britain to India Woman Faces Anxiety and Finds Courage During Her First Solo Overseas Journey

sakal

Updated on: 

-निशा दांडेकर

माझा मुलगा आणि सून ब्रिटनला राहत असल्यामुळे मी व माझ्या नवऱ्याने ब्रिटनला जायचे ठरवले. मुंबईतून जाताना आम्ही एकत्र गेलो; पण येताना त्याला ऑफिसच्या कामामुळे बरेच दिवस सुट्टी मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे तो माझ्या आधी परत आला. मी येताना एकटीच येणार होते. तसे नोकरी करत असल्यामुळे थोडीफार एकटीने फिरायची सवय होती; पण परदेशातून एकट्याने प्रवास करण्याचा माझा अनुभव पहिलाच होता. निघण्याचा दिवस उजाडला आणि मनात आणखीन धाकधूक वाढली. वरून मी अगदी शांत असल्याचा भाव आणत होते, तरी आत मनात खूप भीती वाटत होती. माझे विमान सकाळी साडेनऊ वाजता लंडनहून सुटणार होतं. मला एअरपोर्टवर सोडायला माझा मुलगा आला होता, तो मला एअरपोर्टच्या बाहेर सोडून निघून गेला. आता पुढचा प्रवास मला एकटीला करायचा होता. मुलाला निरोप देताना डोळ्यांत आलेले पाणी पुसले आणि आता आपल्याला एकटीनेच प्रवास करायचा आहे, हे मनात नक्की केले.

Loading content, please wait...