Hair Care : केमोथेरपीनंतर सुरू झालीये केसगळती ? अशी घ्या केसांची काळजी

केमोथेरपीमुळे केस गळणे हे कायमस्वरूपी नसते, तुमचे केस कालांतराने परत वाढतील परंतु केसांचा पोत आणि केसांच्या वाढीच्या दरात काही बदल होऊ शकतात.
hair fall after chemotherapy
hair fall after chemotherapygoogle

मुंबई : अत्याधुनिक उपचारांनी केस गळणे हा कर्करोगाचा एक दुष्परिणाम आहे. केमोथेरपीमुळे गळणारे केस त्या व्यक्तीवर भावनिकदृष्ट्यादेखील परिणाम करतात.

केमोथेरपीशी संबंधित केस गळणे हे केवळ टाळूवरील केसांपुरते मर्यादित नसून भुवया, पापण्या इत्यादींवरही त्याचा परिणाम पहायला मिळतो. (how to care your hair after Chemotherapy )

काही तात्पुरत्या उपायांमध्ये टक्कल झाकण्यासाठी विग किंवा टोप घालणे आणि स्वत:चा आत्मविश्वास पुन्हा मिळवणे यांचा समावेश होतो. पण ते कायमस्वरूपी उपाय नाहीत. त्यामुळे केमोथेरपीनंतर केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगत आहेत डर्मेटो-सर्जन डॉ. रिंकी कपूर. हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

hair fall after chemotherapy
White Hair: कमी वयात केस पांढरे का होतात ? यावर उपाय काय ?

केमोथेरपीमुळे केस का गळतात ?

केमोथेरपी आणि रेडिएशन औषधे ही अतिशय शक्तिशाली औषधे आहेत जी शरीरात वेगाने वाढणाऱ्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात. पण त्याचा शरीरातील निरोगी पेशींवरही परिणाम होतो आणि त्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या दिसू लागतात.

हेअर फॉलिकल्स हे शरीरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या पेशी आहेत आणि कर्करोगाच्या उपचारांमुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. केस गळण्याची समस्या ही सामान्यतः उपचारानंतर २-४ आठवड्यांनी दिसून येते. हे केस गळणे उपचारानंतरही काही आठवडे राहू शकते.

काय कराल ?

केमोथेरपीमुळे केस गळणे हे कायमस्वरूपी नसते, तुमचे केस कालांतराने परत वाढतील परंतु केसांचा पोत आणि केसांच्या वाढीच्या दरात काही बदल होऊ शकतात.

ही वाढ तुम्हाला हवी तितकी जलद होऊ शकत नाही परंतु उपचारानंतर एक किंवा दोन महिन्यांत सुमारे एक इंच वाढू शकते.

केसांच्या वाढीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी फक्त आपल्या डॉक्टरांशी उपचारांबद्दल आणि दीर्घकाळ घेता येणाऱ्या केसांची काळजी याबद्दल चर्चा करा. कर्करोग बरा झाल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी हे आज जाणून घेऊ.

• कोल्ड कॅप/स्काल्प कूलिंग: हे प्रतिबंधात्मक उपचार जे केमोथेरपी दरम्यान केले जातात. ही टोपी टाळूला थंड करते जेणेकरून फॉलिकल्सला कमी नुकसान होते. परंतु हे प्रत्येक रुग्णावर वापरले जाऊ शकत नाही.

• औषधे : मिनोक्सिडिल हे जगभरातील डॉक्टरांनी लिहून दिलेले केसगळतीवरील उपचारांसाठीचे सर्वात लोकप्रिय औषध आहे. हे दिवसातून दोनदा टाळूवर लावावे लागते. नकारात्मक बाजू अशी आहे की एकदा आपण मिनोक्सिडिल वापरणे थांबविले की केस गळणे पुन्हा सुरू होऊ शकते.

• क्युआर678 हेअर रिग्रोथ थेरपी : एफडीए मान्यताप्राप्त उपचार, क्युआर678 हे केमोथेरपीनंतर केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि नवीन केसांच्या वाढीला गती देण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे.

क्युआर678 हे पेप्टाइड्स, अमीनो ऍसिडस्, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले एक नैसर्गिक फॉर्म्युलेशन आहे जे केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी थेट फॉलिकल्समध्ये इंजेक्ट केले जाते. हा केस गळतीवरील कायमस्वरूपी उपाय आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

• पीआरपी किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी : या उपचारामध्ये रुग्णांकडून निरोगी प्लेटलेट वापरणे आणि त्यांना आरोग्यास चालना देण्यासाठी फॉलिकल्समध्ये इंजेक्शन देणे समाविष्ट आहे. या उपचारांना दर सहा महिन्यांनी बूस्टर डोसची आवश्यकता असते.

• केस प्रत्यारोपण : हे केमोथेरपी रूग्णांसाठी योग्य पर्याय आहेत ज्यांच्या केसांच्या कूपांचे नुकसान झाले आहे. फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन (एफयूई) आणि फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांट (एफयूटी) या दोन सर्वात लोकप्रिय केस प्रत्यारोपणाच्या पद्धती आहेत ज्याचा वापर डोक्यावरील टक्कल झाकण्यासाठी केला जातो.

hair fall after chemotherapy
Cancer Symptoms : साधासा वाटणारा ताप असू शकतो गंभीर कर्करोगाचे लक्षण; मुळीच दुर्लक्ष करू नका

उपचार त्यांच्या पद्धतीने कार्य करत असताना, आपण आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेऊन आपल्या केसांच्या चांगल्या आरोग्यास मदत करू शकता.

• तुमच्या टाळूवर हलका शॅम्पू वापरणे.

• तुमचे केस रोज धुणे टाळा आणि गुंता काढण्यासाठी हलक्या डिटॅंगल्स स्प्रेचा वापर करा.

• तुमचे केस ओढले जाऊ नयेत म्हणून रुंद दात असलेला कंगवा आणि मऊ ब्रशचा वापर करा.

• घराबाहेर जाताना टोपी, सनस्क्रीन स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करुन अतिनील किरणांपासून संरक्षण करा.

• केमोथेरपीनंतर 2-3 महिने केसांना आयनिंग, केमिकल कर्लिंग, स्टेटनिग आणि केसांना रंग करणे टाळा.

• केसांमध्ये घर्षण टाळण्यासाठी रेशमी उशांची कव्हरचा वापर करा.

• तुमच्या स्टायलिस्टला लहान केसांसारखी केशरचना सहज राखण्यासाठी विचारा.

• शॅम्पूनंतर केस कोरडे करण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल वापरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com