जीवनात आनंदी कसं रहावं?

प्रत्येक छोट्या छोट्या क्षणात माणूस आनंद शोधत असतो
be happy
be happyesakal

आनंद हा प्रत्येकाला पाहिजे असतो. प्रत्येक छोट्या छोट्या क्षणात माणूस आनंद शोधत असतो पण कधीकधी आपल्याला आनंदी राहता येत नाही. त्याची अनेक कारणे आहेत पण आणि आनंदी राहण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे, हे आपण जाणून घेणार आहोत. (How to make happy yourself)

प्रेमळ वागा

सर्वप्रथम आनंदी राहण्यासाठी आजूबाजूचं वातावरण आनंदी असावे. छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी करा. इतरांसाठी काहीतरी चांगलं केल्याने आपल्याला समाधानाची भावना निर्माण होते. त्यातून आनंद शोधा.

मनात राग ठेवू नये

एखाद्याविषयी मनात राग ठेवणे चुकीचे आहे. कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाइकांमध्ये अशी एखादी व्यक्ती असते, ज्यांच्यासोबत आपलं पटत नाही मात्र मनात त्यांच्याविषयी राग ठेवण्यात अर्थ नाही. वाईट गोष्टी विसरावे आणि आयुष्यात सतत पुढे जात रहावे तरच आपण आनंदी राहू शकतो. त्याचप्रमाणे स्वत:वर किंवा इतरांना चिडणे या गोष्टी आपण थांबवल्या पाहिजे.

नियमित व्यायाम करा

नियमित व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहतं आणि मनही प्रसन्न राहतं यामुळे आनंददायी हार्मोन्स शरीरात निर्माण होतात आणि मन ताजंतवानं वाटतं त्यामुळे आवर्जून व्यायाम करायला हवा.

be happy
डोळ्यावर विश्वास बसणार नाही इतकं भारी असेल तर लक्षात ठेवा.. हा स्कॅम आहे

आवड जपा

आपली आवड कशात आहे, आपल्याला कोणते कपडे आवडतात, आपल्याला काय करायला आवडतं, आपले छंद काय आहे; हे आपण जोपासायला हवे तरच आपण आनंदी राहू. आवडते काम करताना आपल्याला जो आनंद मिळतो तोच आनंद दीर्घकाळ टिकतो

स्वत:वर विश्वास ठेवा

स्वत:वर विश्वास असणे खूप महत्त्वाचा आहे. आपली क्षमता काय आहे, आपण कुठे कमी पडतो, ती उणीव भरून काढणे यातच जीवनाचे यश लपलेले आहे आणि जिथे यश आहे तिथे आनंद सापडतो. आत्मविश्वासामुळे तुमची वाटचाल सोपी होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल

शांत झोप घेणे

आनंदी राहताना शांत झोप घेणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. सतत दिवसभराच्या कामानंतर शरीराला झोप हवी असते. जर आपण झोप योग्य किंवा पुरेपूर घेतली नाही तर चिडचिड किंवा रागीट स्वभाव होतो, त्यामुळे आपल्याला आनंदी राहता येत नाही. त्यामुळे शांत झोप घेणे सुद्धा अतिशय गरजेचे आहे

be happy
बॉयफ्रेंडकडून महिन्याला तब्बल ८० लाख रुपये 'पगार' घेणारी गर्लफ्रेंड

ध्येय असणे

आपल्याला आयुष्यात काय हवं, याचं ध्येय असायला हवं आणि जेव्हा माणूस एकाग्र मनाने परिश्रम घेतो, माणसाचं मन एका ठिकाणी असतं तेव्हा तो आनंदी असतो.

कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा

कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आपण आनंदी राहतो. कुटूबांतील सदस्य आपल्याला समजून घेतात. मित्रांनासुद्धा आपण आपल्या मनातील गोष्टी सांगू शकतो आणि आपल्या समस्या सोडवू शकतो. सोबतच आपल्या आवडत्या व्यक्तींना वेळ द्या. त्यांच्याशी मनसोक्त बोला. मनसोक्त हसा. हवं ते करा.

प्रत्येक दिवसाला सामोरे जा

झालेल्या चुकांचे आत्मचिंतन करा पण वाईट क्षण घेऊन बसू नका. त्यामुळे मन उदास होऊ शकतं.जीवनात येणारे क्षण त्यांना सामोरे जा. आयुष्यात नेहमी पुढचा विचार करा. मागे वळून पाहू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com