esakal | स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी  करा 'हे' घरगुती उपाय

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

sakal_logo
By
शर्वरी जोशी

स्ट्रेच मार्क्स..असं म्हटलं की साधारणपणे प्रेग्नंट स्त्रिया आपल्यासमोर येतात. कारण, बऱ्याचदा हे स्ट्रेच मार्क्स केवळ प्रेग्नंट स्त्रियांनाच येतात असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, हे स्ट्रेच मार्क्स कोणत्याही वयात आणि स्त्री, पुरुष अशा दोघांनाही येऊ शकतात. विशेष म्हणजे या खुणा येण्याची अनेक कारणं आहेत. अनेकदा वजन वाढल्यामुळे, शरीरावरील अतिरिक्त मेद यांच्यामुळेही स्ट्रेच मार्क्स येतात. म्हणूनच, पोट, कंबर, मांड्या यांसारख्या ठिकाणी आलेले स्ट्रेच मार्क्स कसे कमी करायचे याचे काही घरगुती उपाय जाणून घेऊयात. (strech-marks-what-are-they-and-how-to-get-rid-of-some)

१. ऑर्गन ऑइल -

ऑर्गन ऑइलमध्ये व्हिटामिन इ चं मुबलक प्रमाण असतं. ज्यामुळे त्वचेमधील लवचिकता वाढते. म्हणूनच, ऑर्गन आइलने दररोज मसाज केल्यामुळे त्वचेवर पडलेल्या सुरकुत्या दूर होतात. व कालांतराने स्ट्रेच मार्क्ससुद्धा कमी होतात.

२. लिंबाचा रस -

लिंबाचा रस नैसर्गिक ब्लिचिंगचं काम करतो. त्यामुळे स्ट्रेच मार्क कमी करण्यास मदत मिळते. म्हणून दररोज लिंबाचा रस किंवा लिंबाची फोड स्ट्रेच मार्क्सवर लावावी.

हेही वाचा: दुधाची बाटली साफ करताना करु नका 'ही' चूक

३. अंड्यांमधील पांढरा भाग -

अंड्यामधील पांढऱ्या भागामध्ये प्रोटिन्स आणि अमिनो अॅसिडचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुळे त्वचेसाठी ते एखाद्या सुपरफूड प्रमाणे काम करतं. म्हणूनच, स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर अंड्यामधील पांढरा भाग लावावा.

४. बटाट्याचा रस -

बटाट्यामध्ये स्टार्च असतं. ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते. म्हणूनच अनेकदा गुडघे, हाताचे कोपरे, मान यांचा काळपटपणा कमी करण्यासाठी बटाट्याचा रस लावण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे हा रस ब्लीचसारखंदेखील काम करतो.त्यामुळे पोटावरील स्ट्रेच मार्क्स कमी होतात.

५. ऑलिव्ह ऑइल -

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी ऑक्सिडेंट् आणि अन्य पोषक घटकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. या घटकांमुळे डॅमेज झालेली त्वचा रिपेअर होण्यास मदत मिळते. त्यामुळे स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी कोल्ड प्रेस्ड ऑलिव्ह ऑइल लावल्याने हे डाग कमी होतात.

६. साखर-

साखर, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस मिक्स करुन त्याचा स्क्रब तयार करा त्यानंतर स्ट्रेच मार्क्सवर हे स्क्रब लावा आणि १० मिनीटे मालिश करा. १० मिनीटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ पुसून घ्या.

loading image