esakal | दुधाची बाटली साफ करताना करु नका 'ही' चूक
sakal

बोलून बातमी शोधा

दुधाची बाटली साफ करताना करु नका 'ही' चूक

दुधाची बाटली साफ करताना करु नका 'ही' चूक

sakal_logo
By
शर्वरी जोशी

एकेकाळी चमचा वाटीने दूध पिऊन मुलं लहानाची मोठी होत होती. परंतु, आता बदलत्या काळानुसार या चमचावाटीची जागा दुधाच्या बाटलीने घेतली आहे. प्रवासात किंवा घाईगडबडीच्या वेळी दुधाची बाटली वापरणं सहज सोपं होतं. त्यामुळे आज अनेक स्त्रिया बाळाला दूध पाजण्यासाठी बाटलीचा वापर करतात. परंतु, दुधाची बाटली वापरताना काही मुलभूत गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच लहान बाळाच्या दुधाची बाटली कशी स्वच्छ करावी ते पाहुयात. (family-how-to-clean-baby-milk-bottle-ssj93)

दुधाची बाटली स्वच्छ करताना घ्या ही काळजी -

१. अनेकदा दुधाची बाटली स्वच्छ करताना स्त्रिया डिटर्जेंटचा वापर करतात. परंतु, कधीही डिटर्जेंटच्या मदतीने बाटली स्वच्छ करु नये. त्याऐवजी बेबी सोप किंवा बाटली स्वच्छ करण्याचा लिक्विड सोप वापरावा.

२. दुधाची बाटली कधीही गार किंवा कोमट पाण्याने धुवू नये. बाटली स्वच्छ करताना कायम गरम पाण्याचा वापर करावा.

हेही वाचा: दररोज कॉर्नफ्लेक्स खाताय तर वेळीच थांबा!

३. बाटली कायम बॉटल ब्रशने स्वच्छ करावी.

४. बाटलीच्या कानाकोप्यात असलेलं दूध स्वच्छ करावं.

५. प्रथम बाटलीत गरम पाणी टाकावं आणि ती शेक करावी. ज्यामुळे कोनाकोपऱ्यातील दूधाचे चिकट डाग निघतील.

६. बाटलीचं निप्पल आणि अन्य फिडिंग इक्यूपमेंटदेखील स्वच्छ करावं.

हेही वाचा: प्री मॅच्युअर बालकाच्या विकासाचं टेन्शन येतंय?

दुधाची बाटली स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

१. गरम पाण्यात उकळा -

बाळाला दूध पाजण्यासाठी दररोज बाटलीत दूध भरलेलं असतं. त्यामुळे बाटलीला एकप्रकारचा दुधाळ वास येत असतो. तसंच अनेकदा या वासामुळे बाटलीतील दूध सुद्धा खराब होतं. त्यामुळे बाटलीतलं दूध संपल्यानंतर ती गरम पाण्यात छान उकळून घ्या. पातेल्यातलं पाणी पूर्ण गार होईपर्यंत बाटली त्याच पाण्यात राहू द्या. पाणी थंड झाल्यानंतर बाटली आणि अन्य वस्तू पाण्यातून बाहेर काढा आणि छान स्वच्छ पुसून घ्या.

२. स्टीम द्या -

बाटलीमधील विषाणू नष्ट करण्यासाठी स्टीमरच्या सहाय्याने बाटलीला वाफ द्या. आजकाल बाजारात दुधाची बाटली साफ करण्याचे अनेक स्टीम उपलब्ध आहेत. त्याचा वापर करा. जर ते शक्य नसेल. तर गरम पाणी उकळून त्यावर चाळणी ठेवा व या चाळणीमध्ये बाटली व अन्य वस्तू ठेऊन वाफ द्या.

३. स्टेरिलाइजरचा वापर करा -

गेल्या काही काळात स्टेरिलाइजरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे बाळाच्या दुधाची बाटली किंवा अन्य वस्तू तुम्ही स्टेरिलाइजरच्या मदतीने स्वच्छ करु शकता.

loading image