esakal | स्ट्रेच मार्क्स कमी करायचे आहेत? हे करा उपाय

बोलून बातमी शोधा

stretch marks effective home remedies tips health marathi news}

स्ट्रेच मार्क्स पूर्णपणे कधीच जात नाहीत. हा पण तो अदृश्य नक्कीच होऊ शकतात.

lifestyle
स्ट्रेच मार्क्स कमी करायचे आहेत? हे करा उपाय
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : वजन आणि मासपेशी या यांचे प्रमाण अचानक वाढणे हे शरीराच्या वेगवेगळ्या भागात स्ट्रेच मार्क्स वाढवण्यास कारणीभूत ठरतात. लाल पांढऱ्या रंगाच्या अशा रेषा त्वचेला भेद पाडतात. प्रत्येक व्यक्ती यापासून लवकरात लवकर सुटकारा मिळावा म्हणून प्रयत्न करत असतो. परंतु हे स्ट्रेच मार्क्स पूर्णपणे कधीच जात नाहीत. हा पण तो अदृश्य नक्कीच होऊ शकतात. कोलेजनचा वापर करून तुम्ही याला हलकेही करू शकता. येथे आम्ही तुम्हाला असे चार घरगुती उपाय सांगणार आहोत, जे काहीच आठवड्यात स्ट्रेच मार्क्स कमी करायला मदत करतात.

रेटीनॉईड मेडिकेशन
स्ट्रेच मार्कपासून सुटकार पाहिजे असेल तर रेटीनॉईड क्रीमचा वापर ही नॉर्मल गोष्ट आहे. रेटीनॉईड त्वचा मोस्च्युराईज करते मात्र प्रेग्नन्सी मध्ये याचा वापर करणार असाल तर आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.  याचा वापर करण्याआधी शक्यतो उन्हात जाणे टाळा.  त्यामुळं सनबर्न होऊ शकतो.  यामध्ये असणारे व्हिटॅमिन्स हे त्वचेवरील डाग घालवण्यास मदत करतात.

बदाम तेल 
बदाम तेल त्वचेला डागांपासून वाचवते. यात असलेलं व्हिटॅमिन्स इ त्वचेला मॉइस्च्युराईज करते. तसेच स्ट्रेच मार्क्स पासून सुटका करण्यासाठीही मदत होते. जिथे स्ट्रेच मार्क असतील अशा भागावर 15 मिनिटे केलेल्या हलक्या मालिशमुळे स्ट्रेच मार्क्स कमी होतात.


कोको बटर
रात्री झोपताना कोको बटरने स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागी  मालिश करावे. याच्या नियमित वापरामुळे चांगले बदल बघायला मिळतात. कोको बटरमुळे कोलेजन प्रोडक्शन वाढवण्यासाठी मदत होते.


व्हिटॅमिन ए
स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी मदत करते. यासाठी तुमच्या आहारात काही फळे आणि भाज्यांचा समावेश करावा लागेल ज्यामुळे व्हिटॅमीन ए चं प्रमाण वाढेल. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही व्हिटॅमिन एसाठी कॅप्सूलचा वापरही करू शकता.

संपादन- अर्चना बनगे