उन्हाळा आणि आयुर्वेद!

वसंत नुकताच संपून ग्रीष्म ऋतूचे आगमन झाले! ऋतू बदलतात त्याप्रमाणे आपल्याला त्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी दिनचर्येमध्ये बदल करावे लागतात.
Summer and Ayurveda
Summer and Ayurvedasakal

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

वसंत नुकताच संपून ग्रीष्म ऋतूचे आगमन झाले! ऋतू बदलतात त्याप्रमाणे आपल्याला त्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी दिनचर्येमध्ये बदल करावे लागतात. आपल्याही शरीरात ऋतू बदलामुळे होणाऱ्या बदलांशी संलग्न पावले उचलून आरोग्याचे रक्षण करणे गरजेचे आहे!

आयुर्वेदामध्ये दैनंदिन दिनचर्येबद्दल माहिती आहे, त्याचप्रकारे वर्षाकाठी बदलत्या ऋतूनुसार आपली ऋतूचर्या कशी असावी याबद्दलही सांगितले आहे. आजच्या लेखामध्ये आपण उन्हाळा, म्हणजेच ग्रीष्म ऋतू आणि त्यामुळे आरोग्याला होणाऱ्या अपायांपासून कसे सुरक्षित राहता येईल याची माहिती घेऊ यात.

झोप : झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांचे कोमट तेल लावून कांस्य वाटीने अभ्यंग करावे, त्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते. आयुर्वेदामध्ये दिवसाची झोप अपायकारक सांगितली आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये रात्र लहान असल्यामुळे आणि शरीराची मूळ क्षमता कमी होत असल्याने उन्हाळ्यातील दुपारची झोप हितकारक सांगितली आहे.

पाणी आणि इतर द्रव्ये : दिवसभर मातीच्या माठातील थंड पाणी प्यावे, त्या पाण्यामध्ये वाळा घालणे, भिजवलेला सबजा बी घालणे लाभदायक आहे. त्यामुळे शरीराचे तापमान थंड राहते. वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यासाठी रसदार फळे (उदा : कलिंगड, डाळिंब) यांचे सेवन करावे. उसाचा रस, नारळाचे पाणी, कैरीचे पन्हे, निरनिराळी सरबते (नैसर्गिकरीत्या बनवलेली) यांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते.

उन्हाळ्यातील आहार : थंड प्रकृतीच्या कोथिंबीर आणि पुदिना यांच्या चटणीचा आहारामध्ये समाविष्ट केल्याने पचनाला मदत होते, दररोज जेवणानंतर ताक पिणे फायद्याचे आहे. तिखट, आंबट तसेच उष्ण, गरम पदार्थ खाऊ नयेत. उन्हाळ्यामध्ये गोड, थंड, पातळ म्हणजेच अधिक द्रव्य असलेले अन्न सर्वाधिक फायद्याचे आहे.

उन्हाळ्यातील राहणीमान

आयुर्वेदामध्ये आवर्जून आपल्या राहणीमानाविषयी भाष्य केले आहे. उन्हाळ्यामध्ये हलके, पातळ आणि मोकळे असे सूती, कॉटनचे कपडे घातल्याने शरीराभोवती हवा खेळती राहण्यास मदत होते. घाम शोषून घेतला जातो आणि शरीराचे तापमान कमी राहण्यास मदत होते.

उन्हामध्ये शक्य होईल तितके फिरणे टाळावे. उष्णतेचा त्रास होत असलेल्यांनी थंड पदार्थ जसे कापूर, नागरमोथा (मुस्ता), चंदन यांचे लेप शरीरावर किंवा किमान चेहेऱ्यावर लावल्यास खूप आराम मिळेल व उष्णता कमी व्हायला मदत होईल.

एरंडेल तेल कपाळावर भुवयांमध्ये (आग्न चक्र), गळ्याच्या खालच्या बाजूस (विशुद्धी चक्र) आणि छातीवर दोन्ही बरगड्या मिळतात त्याच्या सर्व खालच्या बाजूस (अनाहत चक्रावर) लावावे. याने शारीरिक उष्णता झपाट्याने कमी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com