Summer Laziness Tips : अतिशय युनिक,वेगळा असा आळस तुम्हालाही येत असेल तर या गोष्टी करा,रहाल दिवसभर फ्रेश

ऑफिस मॅनेजमेंटमध्ये ऑफिसमधील वातावरण फ्रेश राहील यासाठी काही खास युक्त्या केल्या जातात
Summer Laziness Tips
Summer Laziness Tipsesakal

Summer Laziness Tips :

काहीवेळा इतका आळस येतो की सतत झोपून रहावं, काहीच करू नये असं वाटू लागतं. घरी असेल तेव्हा कोणी विचारत नाही का झोपलाय म्हणून. पण, जॉबवर असतानाही आळस यायला लागला. तर तो संपूर्ण ऑफिसमध्ये चर्चेचा विषय बनतो.

आजकाल कडक उन्हामुळे सतत झोप येत असल्याचा अनुभव प्रत्येकानेच घेतला असेल. उन्हातून प्रवास केल्यानंतर आळस भरतो. थंड वारा अंगावर घेत पडून रहावं वाटतं. संपूर्ण शरीर थकल्यासारखे वाटते. त्यावर काही सोपे उपाय करून तुम्हाला या आगळ्या-वेगळ्या आळसातून मुक्ती मिळू शकते.  

Summer Laziness Tips
Morning Laziness Remedies : सकाळी-सकाळीच अंगात भरतो आळस तर या टिप्स वापरा, दिवसभर रहाल फ्रेश अन् कूल

दिवसाची सुरूवात चांगली करा

शरीरात आळस भरलेला असताना सकाळी अंथरून सोडावं वातट नाही. पण, कामासाठी लवकर उठावेच लागते. पण दिवसभर पुन्हा आळसाने ग्रासलेले असते. त्यासाठी सकाळी उठताच तुम्ही थोडा व्यायाम केलात.

काही मिनिटे चालणे आणि त्यानंतर कपालभारती सारखे बैठे व्यायाम केले तरी तुम्हाला ताजेतवाणे वाटू शकते. सुरूवातीला लवकर उठल्याने झोप येतेय असे वाटेल पण २ ३ दिवसात तुम्हाला चांगला परिणाम जाणवेल.

Summer Laziness Tips
Lazy Competition : सर्वांत आळशी व्यक्तीला मिळणार 90 हजारांचे बक्षीस; काय आहे नेमकं प्रकरण? स्पर्धेविषयी जाणून घ्या

ध्येयाचा विचार करा

तुम्हाला आळस येईल, झोप येत असेल किंवा काम करायची इच्छा नसेल. तेव्हा तुमच्या जीवनात असलेलं ध्येय नजरेसमोर आणा. तुम्ही आता कुठे आहात आणि तुम्हाला कुठे पोहोचायचंय याचा विचार तुमचा सर्व आळस दूर करेल.

भोवतालच वातावरण

ऑफिस मॅनेजमेंटमध्ये ऑफिसमधील वातावरण फ्रेश राहील यासाठी काही खास युक्त्या केल्या जातात. कारण, आपण काम करत असलेल्या ठिकाणावर कर्मचाऱ्यांना काम करण्याची इच्छा व्हावी यासाठी वातावरण निर्मिती केली जाते. तसेच, तुम्ही काम घरातून करत असाल किंवा तुमचं ऑफीस असेल, तर तुम्ही आजूबाजूला कामासाठी प्रोत्साहन देईल अशी साजवट करायला हवी.

मित्रांची निवड

काही वेळा ऑफीसमधील मित्राचे काम झाले म्हणून तुम्ही तुमचे काम अर्धवट टाकून चहा,नाश्त्याला जाता. तेव्हा तुमचं राहीलेल्या कामाचा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. त्यामुळेच ऑफीसमध्ये अशा सर्कलमध्ये मिक्स व्हा जे कामाच्या बाबतीत ऍक्टीव्ह असतील. आणि जे तुम्हालाही काम चांगल करण्यात प्रोत्साहन देतील.

Summer Laziness Tips
Exercise To Avoid Laziness : हिवाळ्यात या स्ट्रेचिंग एक्सरसाइजने दिवसाची सुरुवात करा, आळस होईल दूर

सोशल मिडियाचा वापर

आजकाल ऑफीस असो वा घरकाम काम वेळेवर पूर्ण होत नाहीत त्याला कारण आहे सोशल मिडिया. कारण, सोशल मिडीयावर आलो की तास-तासभर रिल्स,व्हिडिओ पाहण्यात कधी निघून जातो कळत नाही. त्यामुळेच, कामाच्या वेळी काम आणि कामसंपल्यानंतर मोबाईलचा वापर हा नियम बनवून घ्या, म्हणजे शरीरातील आळस दूर होईल आणि कामही भरभर होतील.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com