Summer Skin Care: उन्हाळ्यात चेहरा अन् त्वचा दिसेल फ्रेश, फक्त 'असा' करा जेल क्लींझरचा वापर

How To Use Gel Cleanser: तुम्हाला चेहरा चमकदार आणि कोमल हवा असेल कर जेल क्लींझर वापरू शकता.
Face Cleaning
Face Cleaning Sakal

Summer Skin Care how to use gel cleanser for clean and glowing skin and face

उन्हाळा सुरू झाला असून आरोग्यासह त्वचेची काळजी घ्यावी. कारण उन्हाळ्यात सुर्याच्या तीव्र किरणांमुळे त्वचा काळी पडू शकते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक लोक महागडे प्रोडक्ट वापरतात. पण त्याचा काही रिझल्ट दिसत नाही. उलक काही दिवसानंतर चेहरा खराब होऊ शकतो. तुम्ही चेहरा स्वच्छ करण्यासाठी जेल क्लींझर वापरू शकता. ते त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासोबत मृत त्वचा देखील काढून टाकते. जेल क्लींझर कसा वापरावा आणि त्याचे काय फायदे आहेत हे पुढील मुद्द्यावरून जाणून घेऊया.

  • चेहरा फ्रेश राहतो

जेल क्लींझरचा वापर केल्यानंतर चेहरा धुतल्यास फ्रेश वाटते. जेल क्लींझर लाइट असल्याने त्वचा फ्रेश आणि कूल असते. तुम्ही सकाळी किंवा वर्कआऊटनंतरही याचा वापर करू शकता.

  • उन्हाळ्यात फायदेशीर

उन्हाळ्यात त्वचेची काळजी काळजी घेणे गरजेचे असते. यामुळे तुमच्या डेली स्किन केअर रूटीनमध्ये जेल क्लींझरचा वापर करू शकता. जेल क्लींझरचा वापर केल्याने त्वचेला थंडावा जाणवतो. जर तुम्ही उन्हाळ्यात घराबाहेर जाणार असाल तर याचा वापर करावा.

Face Cleaning
Benefits of Asparagus : महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी रामबाण औषधी मानली जाते शतावरी, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे
  • पीएच लेव्हल संतुलित

जेल क्लींझर वापरण्याचा एक फायदा म्हणजे पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यास मदत करतो. जेल क्लींझर अशा प्रकारे बनवले जातात की ते त्वचेच्या नैसर्गिक पीएच लेव्हल संतुलित ठेवतो. जेल क्लींझर वापरल्यास त्वचा खूप कोरडी किंवा निर्जीव दिसत नाही. कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर जेल क्लींझर वापरू शकता.

  • चेहरा स्वच्छ होतो

जेल क्लींझर वापरल्याने त्वचेतील घाण निघून जाते. जेल क्लींझर चेहऱ्यावरील तेलकटपणा, मेकअप, मृत त्वचा काढून टाकते. त्यामुळे रोज बाहेरून आल्याने जेल क्लींझर चेहरा स्वच्छ करावा.

  • जेल क्लींझर कसं वापरावं

  1. सर्वात पहिले चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

  2. नंतर हातावर थोडे जेल क्लींझर घेऊन त्यात थोडे पाणी मिक्स करावे आणि चेहऱ्यावर लावावे.

  3. यानंतर 10 मिनिटं हलक्या हाताने मसाज करावी.

  4. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा आणि कोरडा करावा.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com