Summer Skin Care: उन्हाळ्यात चमकदार त्वचा हवी असेल तर वापरा 'हे' घरगुती फेसपॅक

Summer Skin Care: तुम्हाला उन्हाळ्यात चमकदार त्वचा हवी असेल तर पुढील फेसपॅक वापरू शकता.
Summer Skin Care
Summer Skin CareSakal

try these homemade face packs glowing skin in summer

उन्हाळ्यात चेहऱ्यासंबंधित अनेक समस्या सुरू होतात. या दिवसांमध्ये महिला त्यांच्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आणि चमकदार त्वचा ठेवण्यासाठी अनेक प्रकारची ब्यूटी प्रोडक्ट वापरतात.

तसेच अनेक घरगुती उपायांचा वापर करतात आणि फेस पॅक देखील वापरतात. तुम्हालाही उन्हाळ्यात चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही पुढील घरगुती फेस पॅक वापरू शकता.

उन्हाळ्यात कोणते घरगुती फेस पॅक वापरावे

  • दही,मध आणि बेसण

तुम्ही दही, बेसन आणि मध मिक्स करून फेस पॅक तयार करू शकता. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे दही आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर असते. बेसनामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे, फायबर असे अनेक गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि ते चेहऱ्यासाठीही वापरता येतात. मधामध्ये अनेक गुणधर्म असतात. मध आरोग्यासह चेहऱ्यासाठीही फायदेशीर आहे. .

  • असा करा वापर

दही, बेसन आणि थोडे मध एकत्र करावे आणि चांगली पेस्ट बनवावी.

चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर पेस्ट चेहऱ्यावर लावावी.

फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझ लावावे.

आठवड्यातून एक ते दोन दिवस हा फेसपॅक लावा.

Summer Skin Care
Heat Stroke: उन्हाळ्यात उष्माघातापासून कसा कराल बचाव, जाणून घ्या सविस्तर
  • पपई आणि चंदन पावडर

उन्हाळ्यात तुम्ही पपईचा गर आणि चंदन पावडरच्या मदतीने घरी फेस पॅक बनवू शकता. पपईमध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि बायोफ्लेव्होनॉइड्स असतात जे मुरुम दूर करतात आणि चेहरा स्वच्छ करतात. चंदनातही अनेक गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेचा रंग उजळ होतो.

  • अशा प्रकारे वापरा

पपई कापून गर काढावा आणि त्यात चंदन पावडर मिक्स करा.

पपईचा गर आणि चंदन पावडरची पेस्ट चेहऱ्यावर लावा.

फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझ लावावे.

आठवड्यातून एक ते दोन दिवस हा फेसपॅक लावा.

  • तांदुळ पावडर , संत्रा पावडर आणि दुध

उन्हाळ्यात चमकदार त्वचा हवी असेल तर तांदुळ पावडर, संत्रा पावडर आणि दूध मिक्स करून घरीच फेसपॅक तयार करू शकता. यामुळे चेहऱ्यावरची घाण निघून जाते आणि चमकदार दिसतो.

कसा कराल वापर

सर्वात पहिले चेहरा स्वच्छ धुवावे.

तांदुळ पावडर, संत्रा पावडर आणि दूध एकत्र करून चांगली पेस्ट बनवावी.

नंतर हा फेसपॅक वाळल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवावे.

आठवड्यातून एक किंवा दोन दिवस हा फेसपॅक वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com