Summer Vacation: उन्हाळी सुट्टीत मुलींचा मेंदी काढण्याकडे कल; लग्नसराईत रोजगार मिळवणेही शक्य

Mehandi Classes: सुटीच्या दिवसांत मेहंदी शिकणे मुलींना त्यांच्या सर्जनशीलतेचा आणि कलात्मकतेचा विकास करण्यास मदत होते आणि आत्मविश्वास देखील वाढतो.
Summer Vacation| mehandi course
Summer Vacation| mehandi courseSakal

summer vacation learn Mehandi degine best source of money for women

शाळेचे पेपर संपले की उन्हाळा सुट्या लागतात. उन्हाळी सुटी म्हटले की मजा, मौज आणि खेळाची वेळ. पण या सुटीमध्ये मुलांना काहीतरी नवे कौशल्य शिकण्याचीही संधी मिळाली तर ते उत्तम म्हणून मेंदीचा कोर्स करण्याकडे मुलींचा कल असतो.

मेंदी भारतीय संस्कृतीचा आणि सौंदर्याचा एक विशेष सुंदर भाग आहे. केवळ सण आणि उत्सवाच्या वेळी नसून शुभकार्यांसाठीही हातावर मेंदी काढली जाते. सुटीच्या दिवसांत मेहंदी शिकणे मुलींना त्यांच्या सर्जनशीलतेचा आणि कलात्मकतेचा विकास करण्यास मदत होते आणि आत्मविश्वास देखील वाढतो.

उन्हाळ्यासोबत लग्न सराईला सुरवात होते. लग्नसराईच्या निमित्ताने सगळीकडे आनंदमय वातावरण असते. याच वेळी मुलींमध्ये मेंदीचा कलाकुशलकडे धडपड असते. सध्या शाळा कॉलेजच्या सुट्या असल्याने मुली या सुटीचा चांगला उपयोग करून मेंदीचे धडे घेत आहेत.

तसेच मेंदी काढताना लक्ष, हाताचे नियंत्रण आणि एकाग्रता वाढते. मेंदी ही केवळ सौंदर्य वाढविण्यासाठीच नसून शुभकार्याचे प्रतीक मानले जाते. मेंदीच्या कलेला जोपासत अनेक मुली बेसिक पासून ते अॅडव्हान्स मेंदी आज स्वतःचा व्यवसाय देखील करत आहे. मेंदी ही वेगवेगळ्या प्रकारात काढली जाते. हत्ती, डोली, वेली, फूल, मनुष्याचे चित्र, लहान मोठ्या रेषा अशा अनेक प्रकाराने मेहंदी रेखाटले जाते.

मेंदी डिझाइनचे प्रकार

  • अरेबिक मेंदी

  • इंडियन मेंदी

  • मंडाला मेंदी

  • ब्राइडल मेंदी

  • इंडो-अरेबिक मेंदी

  • वेस्टन मेंदी

मेंदीचे फायदे

  • ताण कमी करते.

  • शरीरातील उष्णता कमी करते.

  • त्वचा थंड करते आणि जळजळ कमी होते.

Summer Vacation| mehandi course
Parenting Tips: मुलांना सुट्टीमध्ये नातेवाईकांच्या घरी घेऊन जात असाल तर आधी 'या' गोष्टी शिकवा

कलाकौशल्यचे शिक्षणाच्या सर्व स्तरांना स्वतःचे विशेष महत्त्व आणि स्थान आहे. जीवनातील कठीण काळात आव्हानांचा सामना करण्यास मदत करते. कलाकौशल्य लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर आणि वेगळी ओळख मिळण्यास मदत होते. यात मेंदीतील कौशल्याने आजकाल चांगला रोजगारही मिळत आहे.

-प्रणोती लक्षात, सोलापूर

उन्हाळ्यात शाळा, कॉलेजला सुटी असते. यामुळे दिवसभर घरी बसून वेळ वाया जाऊ नये म्हणून अनेक मुलींचा विविध कलाकौशल्याचे शिक्षण घेण्याकडे कल असतो. मेंदी ही सर्वांना आवडत असल्याने कलात्मक कौशल्यांची चांगली प्रगती होते. मेंदी डिझाइन स्वच्छ आणि सुंदर काढून आपल्या कलेने समोरच्याचे मन जिंकता येते.

- नागमा दलसिंगे, विद्यार्थिनी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com