

Tailbone Pain Relief: Best Home Exercises & Stretches
esakal
Tailbone Pain After Sitting: आधुनिक जीवनशैलीत सतत अनेक तास एकाच जागी बसून काम करण्याची सवय आणि वाढता दुचाकीचा प्रवास यामुळे पाठीच्या आणि कंबरेच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः महिलांमध्ये पस्तिशीनंतर खूप वेळ बसून उठताना माकड हाड (Tailbone) भयंकर ठणकण्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
दुचाकी चालवताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पाठीच्या मणक्याला बसणारे धक्के, गरोदरपण आणि बाळंतपणाच्या काळात पाठीवर व कंबरेवर आलेला अतिरिक्त ताण ही या त्रासामागची मुख्य कारणे मानली जातात. या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन बसणे आणि उठणेही कठीण होऊन बसते. हा त्रास कमी करण्यासाठी आणि टेलबोनचा ताण मोकळा करण्यासाठी तज्ज्ञांनी काही सोपे घरगुती व्यायाम (Stretching Exercises) सुचवले आहेत.