दारात पार्सल आलंय? ते घेताना कधीच करु नका 'या' चुका

अशावेळी सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे
Parcel
Parcelesakal
Summary

बहुतांश मध्यमवर्गीय घरांमध्ये रेशनसाठीही ऑनलाइन खरेदी सुरू झाली आहे.

ऑनलाइन शॉपिंगचा (Online shopping) ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून जोरदार सुरु आहे, ज्याला कोविडमुळे (Covid) आणखी चालना मिळाली. बहुतांश मध्यमवर्गीय घरांमध्ये रेशनसाठीही ऑनलाइन खरेदी सुरू झाली आहे. परंतु यामुळे स्त्रिया आणि मुलांच्या सुरक्षेबाबतही चिंता निर्माण झाली आहे. याचे कारण वेळोवेळी सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून घरातून लुटूमार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महिलांनी घरात राहताना कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात.

Parcel
पार्टनरला Gift देणे का महत्वाचे ? ५ कारणे समजून घ्या

घरी एकटे असताना आणि डिलिव्हरी बॉय आल्यावर काय करावे?

दरवाजा उघडण्यापूर्वी तेथे कोण आहे ते जाणून घ्या - घरातील दरवाजा उघडण्यापूर्वी एकदा बाहेर कोण आहे पाहा. जर पेमेंट आधीच केले असेल, तर डिलिव्हरी बॉयला (Delivery Boy)
सामान दारात ठेवायला सांगा.

पार्सल उचलण्यासाठी फोन घेऊन जा - तुम्ही घरी एकटे असताना पार्सल घेणार असाल तर तुमचा फोन (Phone) सोबत घ्या. याशिवाय, पार्सल घेताना कॉलवर घरातील कोणत्याही सदस्याशी दोन मिनिटे संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. डिलिव्हरी बॉय औपचारिकता (Formalities) पूर्ण करत नाही तोपर्यंत फोनवर 'तुम्ही आलात ठीक आहे, गाडी पार्क करा, माझ्याबरोबर या अशा गोष्टी फोनवर करा.

Parcel
बिअर केसांना लावून धुतल्याने काय परिणाम होतात? जाणून घ्या

घरामध्ये कोणीतरी आहे असे वागणे - जेव्हाही तुम्ही पार्सल घेण्यासाठी बाहेर पडाल तेव्हा समोरच्या व्यक्तीला घरामध्ये घरातील पुरुष सदस्य असल्याची जाणीव करून द्या. दार उघडून नावाने हाक मारणे, 'गॅस बंद करा, नळ बंद करा' अशा गोष्टी सांगून सामान पोहोचवायला आलेल्या माणसाला घरात कोणीतरी माणूस आहे, असे वाटू लागते.

घरात एखादी स्त्री असेल तर तिला बोला - जेव्हा तुम्ही दार उघडायला गेलात आणि समोर एखादी अनोळखी व्यक्ती उभी असलेली दिसली, तेव्हा घरात उपस्थित असलेल्या महिलेला (आई, दीदी किंवा वहिनी) आवाज देऊन बोला. यामुळे त्या व्यक्तीला कळेल की ती महिला घरात एकटी नाही. त्यावेळी तो व्यक्ती काहीही चुकीचे करणार नाही.

फोनवर सावधगिरीने बोला - जर तुम्ही कोणाशी फोनवर बोलत असाल आणि तेवढ्यातच सामानाची डिलिव्हरी येत असेल, तर बोलताना काळजी घ्या. घरी काय आहे, कोण आहे आणि कोण नाही, किंवा तुमच्या पर्सनल गोष्टींबद्दल बोलणे टाळा.

Parcel
मुलींनो, हेअरस्टाईलसाठी पर्याय शोधताय! 'हे' पाच प्रकार आहेत ट्रेंडमध्ये

जर तुमचे मूल घरी एकटे असेल अशावेळी पार्सल आले तर या गोष्टी लक्षात ठेवा

- आजूबाजूला ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांना सांगा की तुमचे मूल एकटे आहे आणि कोणीतरी सामान पोहोचवायला येईल.

- मुलाला समजावून सांगा की कोणी दारात आले तर ओळखल्याशिवाय दार उघडू नका.

- शक्य असल्यास, मुलाला पार्सल घेण्यामध्ये अडकवण्याऐवजी शेजाऱ्याला पार्सल घेण्यास सांगा.

- डिलिव्हरी बॉयकडून सामान घेण्यासाठी मुलाला खाली पाठवत असाल तर बाल्कनीतून मुलावर लक्ष ठेवा.

- जर मुल घरात एकटे असेल आणि सामान घेऊन जात असेल तर त्याला सांगा की डिलिव्हरी बॉयला सामान बाहेर ठेवायला सांगा आणि माहिती द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com