पार्टनरला Gift देणे का महत्वाचे ? ५ कारणे समजून घ्या

कोणत्याही नातेसंबंधात लहान-सहान भेटवस्तू देणे हे फारच आनंददायी असते
Gift for partner
Gift for partneresakal

व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) आणि व्हॅलेंटाईन डे पुढच्या आठवड्यात आहे. अनेक कपल्स हा दिवस साजरा करण्यासाठी तयारी करत आहेत. अनेक लोकांना हा दिवस का साजरा करावा ते समजत नाही. भावनांना (Emotions) फारसे महत्व देणे त्यांच्यासाठी गरजेचे नसते . म्हणून भौतिक गोष्टीत अडकणे त्यांना नकोसे वाटते. साहजिकच गिफ्ट (Gift) देण्याबाबतही ते फारसे उत्सुक नसतात. त्यांना यामागचा आनंद लक्षात येत नाही. पण अनेक कपल्सना (Couples) एकमेकांना गिफ्ट देणे आवडते. हे असे का वाटू शकते त्याची पाच कारणे आहेत. कारण कोणत्याही नातेसंबंधात लहान-सहान भेटवस्तू देणे हे फारच आनंददायी असते. गिफ्ट देणे का गरजेचे यामागची पाच कारणे आहेत.

Gift for partner
KIds-Free Relationships साठी मिळेल पार्टनर, डेटिंग अ‍ॅप होणार लॉन्च
Love
LoveLove

१) भावना प्रकट करणे (Manifesting emotions)

नातेसंबंधात जोडीदाराकडून प्रेमाचे शब्द, कौतुकाचे शब्द हवेहवेसे वाटतात. पण, कधीकधी समोरच्या व्यक्तीसाठी विशिष्ट प्रसंगी भेटवस्तू देणे महत्त्वाचे असते. जर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकत नसाल, तर तुम्ही जोडीदारासाठी एखादे अर्थपूर्ण गिफ्ट घेऊ शकाल. यामुळे तुमच्या पार्टनरला होणारा आनंद शब्दातीत असेल. तसेच तुमच्या भावनांची जाणीवही त्याला अधिक चांगल्या प्रकारे होईल.

Gift for partner
बायकोने नवऱ्याच्या नकळत त्याचा फोन बघणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

२) कृतज्ञता व्यक्त करा (Show gratitude)

जर तुमचा जोडीदार तुमच्यासाठी गिफ्ट आणणार नसेल किंवा तुम्हाला गिफ्ट काय हवंय ते विचारणारा नसेल तर अजिबात अपसेट होऊ नका. उलट तो तुमच्यासाठी नेहमी जवळ असतो याविषयी कृतज्ञता म्हणून त्याला किंवा तिला आवडणारी एखादी गोष्ट तुम्हीच पार्टनरला द्या. काहीवेळा शब्द कमी पडतात तेव्हा एक छोटीशी भेट खूप काही सांगून जाते.

Gift for partner
जोडीदाराशी भांडण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

३) माफी म्हणून गिफ्ट( As an apology)

काहीवेळा फक्त दिलगीरी म्हणून गिफ्ट दिल्याने फरक पडतो. जर तुमच्यात भांडण झाले असेल. त्यात तुमची चूक असेल तर अशावेळी पार्टनरला शांत करणे कठीण असते. अशावेळी दुखावलेल्या पार्टनरला शांत करण्यासाठी त्याच्या आवडीचे गिफ्ट पुरेसे ठरते. हे गिफ्ट देताना होणारा स्पर्श माणूस म्हणून खूप महत्त्वाचा ठरतो. कारण त्या व्यक्तीने केलेले प्रयत्न पाहायचे आणि भावना खूप महत्वाच्या ठरतात.

Gift for partner
लग्नानंतरचा पहिला Valentine's Day आहे? असा बनवा Special

४) लक्षात राहणे सेलिब्रेशन (Milestone celebrations)

नातेसंबंधात, प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. कपल्सना त्यांचा आयुष्यभराचा प्रवास संस्मरणीय असावा असे वाटते. प्रत्येक दिवस लक्षात ठेवू शकत नाही. पण एकमेकांचे वाढदिवस, पहिल्यांदा भेटलो, प्रपोज केलं तो दिवस, एकत्र राहण्याचा काळ असे सारे जपून ठेवा. त्याच्या/तिच्या आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण घडले तर त्याचीही नोंद करा. हा दिवस स्पेशल करण्यासाठी प्लॅन करा. पार्टनरला दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बाहेर न्या. अशावेळी एक छान भेटवस्तू दिल्याने आणखी रंगत येईल.

Gift for partner
Valentines Day : हॅप्पी-हेल्दी रिलेशनशिप हवयं? फॉलो करा या 5 सवयी
love gift
love gift

५) प्रेम पुन्हा जागृत करा (Rekindling your love) - काही काळ एकत्र राहिलेल्या जोडप्यांमध्ये ठिणगी पडदे. एकेकाळी हा जोडीदार फार आवडायचा हे कपल्स विसरात. त्यासाठी सुरूवातीच्या काळात तुम्ही एकत्र करत असलेल्या गोष्टी करणे महत्वाचे आहे. म्हणून पार्टनरला काहीतरी भेट देत जुन्या आठवणींना उजाळा द्या. यामुळे तुमचे प्रेम अधिक बहरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com