Winter Skincare : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेतली, तर त्वचा दिसेल हेल्दी आणि ग्लोइंग

थंडीमध्ये चेहऱ्याला फेशियल वगैरे रेग्युलर करून आणि सीटीएम फॉलो केलेच पाहिजे, तरच त्वचा हेल्दी अन् ग्लोइंग दिसेल. त्याशिवाय हात, पाय, पाठीसाठी तुम्ही बॉडी पॉलिशिंग करून त्वचेचा रफनेस कमी करू शकता.
Winter Skincare
Winter Skincare esakal

(लेखिका - स्वप्ना साने)

थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे त्वचा ड्राय जाणवतेय. चेहऱ्याची काळजी तर बऱ्यापैकी घेते आहे. फेशियल, क्लिनप आणि सीटीएम रुटीन नियमित करते. पण बाकी हात, पाय, पाठ यांची स्कीन खूप डल आणि रफ जाणवतेय. काय करता येईल? काही घरगुती उपाय असेल तर सुचवा.

: थंडीमध्ये चेहऱ्याला फेशियल वगैरे रेग्युलर करून आणि सीटीएम फॉलो केलेच पाहिजे, तरच त्वचा हेल्दी अन् ग्लोइंग दिसेल. त्याशिवाय हात, पाय, पाठीसाठी तुम्ही बॉडी पॉलिशिंग करून त्वचेचा रफनेस कमी करू शकता. महिन्यातून एकदा बॉडी स्पा अथवा बॉडी पॉलिशिंग जरूर करावे, सलूनमध्ये जाऊन करावे.

ह्याशिवाय, घरच्या घरी तुम्ही बॉडी स्क्रब बनवू शकता. एक वाटी साधे ओट घेऊन मिक्सरमध्ये त्याची पूड करावी. त्यात थोडी चंदन पावडर, गुलाबाच्या पाकळ्यांची पूड, चिमूटभर हळद, अर्धी वाटी मिल्क पावडर मिक्स करावी. हे सगळे चांगले मिक्स करावे.

अंघोळ करताना थोडे वाटीत घ्यावे आणि पाणी अथवा दही अथवा दूध घालून पेस्ट करावी. त्वचेवर हळुवार स्क्रब करत लावावी. दहा मिनिटे ठेवून कोमट पाण्याने धुऊन घ्यावे. नंतर बॉडी लोशन लावावे. असे नियमित केल्यास महिन्याभरात तुम्हाला पूर्ण त्वचा सॉफ्ट आणि हेल्दी झालेली जाणवेल.

थंडीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे एक काळजी घ्यावी- अंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नये, कारण त्यामुळे त्वचा जास्त कोरडी होऊ शकते. खूप जास्त साबणाचा वापर करू नये, त्याऐवजी उटणे किंवा माइल्ड शॉवर जेल वापरावे. त्वचा ओलसर असतानाच बॉडी लोशन लावावे, म्हणजे ओलसर त्वचेत ते लगेच सामावून जाते.

बॉडी पॉलिशिंगमुळे त्वचा सॉफ्ट आणि हेल्दी दिसेल, पण हिवाळ्यात पायाला जर भेगा पडत असतील, तर इतर त्वचेसोबत पावलांचीही काळजी घ्यावी लागेल. अशा वेळेस पेडिक्युअर नियमितपणे करावे. रात्री पावलांना, टाचेला फूट क्रीमने हलका मसाज करावा. शक्य असल्यास मसाज केल्यावर मोजे घालून झोपावे, म्हणजे रात्रभरात पावलांचे हीलिंग होईल.

ह्याशिवाय, हात जर जास्त ड्राय होत असतील किंवा सारखे पाण्यात काम असेल किंवा उन्हात, बाहेरची कामे असतील, तर नरीशिंग हँड क्रीम लावावे. कारण अशावेळी फक्त बॉडी लोशनने नरीशमेंट मिळत नाही, तर थोडे रिच क्रीम लावणे आवश्यक असते.

हँड क्रीम रात्री झोपतानाही लावावे, जास्त फायदा होतो. शक्य असल्यास पाण्यातील कामे करताना ग्लोव्ह वापरावेत. बाहेर जातानाही सन प्रोटेक्टिंग ग्लोव्ह वापरावेत. चेहऱ्यासोबतच बाकी पूर्ण बॉडीसाठी वरील सांगितल्याप्रमाणे काळजी घेतली, तर नक्कीच बाकी त्वचाही सॉफ्ट आणि हेल्दी दिसेल.

माझे वय तेवीस वर्षे आहे. स्कीन टाइप नॉर्मल आहे. तसा काही प्रॉब्लेम नाही, पण तरी त्वचेची काळजी घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे? हे कळत नाही. माझ्या मैत्रिणी चेहऱ्याला सारख्या खूप काहीतरी लावत असतात, मी पण असे काही करायला हवे का?

: खरेतर टीनएजपासून जवळ जवळ सगळ्या मुली आणि हल्ली मुलेसुद्धा स्वतःची त्वचा आणि केसांबद्दल जागरूक असतात. त्यात लाखोंच्या संख्येने उपलब्ध असलेले डीआयवाय व्हिडिओ बघून काही विचार न करता प्रयोग करून बघतात. मैत्रिणी काही वापरात म्हणून आपल्यालाही तेच प्रॉडक्ट सूट होईल असे नसते. मला खूप आवडले की तू विचार करून हा प्रश्न विचारलास आणि माहिती करून घेते आहेस. खरेतर ह्यामुळे सगळेच वाचक जागरूक होतील.

तर त्वचा नॉर्मल आणि प्रॉब्लेम फ्री आहे, तरी त्वचेची काळजी ही घ्यावीच. म्हणजे रोज त्वचा स्वच्छ करणे. दिवसभर बाहेर असाल तर सन स्क्रीन लावून जाणे. झोपायच्या आधी सीटीएम म्हणजे क्लिन्सिंग, टोनिंग करणे आणि मॉइस्चरायझर त्वचेला लावणे.

मेकअप करत असाल तर आधी मेकअप रिमूव्हरने क्लीन करून मग सीटीएम करावे. तर हे झाले बेसिक स्कीन केअर रुटीन. आठवड्यातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करावी, म्हणजे स्क्रब करून मृत त्वचेचा थर काढावा. नंतर एखादा नरीशिंग पॅक, फ्रूट पॅक अथवा होम मेड पॅक लावावा.

दुसऱ्याला जे प्रॉडक्ट सूट होतेय, ते तुमच्या त्वचेला सूट होईलच असे नसते, हे नेहमी लक्षात घ्यावे. त्वचेसाठी आणि केसांसाठीसुद्धा, आपला स्कीन टाइप आणि हेअर टाइप लक्षात घेऊनच प्रॉडक्ट निवडावे, अथवा आपल्या ब्यूटी थेरपिस्टला विचारून माहिती करून घ्यावी. कुठल्याही इन्स्टंट ग्लो फेअरनेस प्रॉडक्टच्या आहारी जाऊ नये. आपले नॅचरल कॉम्प्लेक्शन आहे तेच चांगले ठेवायचा प्रयत्न असावा.

माझे वय छप्पन्न आहे. वयोमानानुसार त्वचेमधील ऑइल आणि मॉइस्चर कमी झालेले जाणवते. बाराही महिने त्वचा कोरडी आणि डल दिसते. अँटी एजिंग फेशियल रेग्युलर करते, पण फेशियल केल्यानंतर दोन किंवा फार तर तीन दिवस त्वचा चांगली वाटते, नंतर परत रुक्ष होते. काय करावे?

: तुम्ही रेग्युलर अँटी एजिंग फेशियल करताय, पण रेग्युलर म्हणजे महिन्यातून एकदा तरी करताय ना? आणि अँटी एजिंगमध्ये नरीशिंग आणि हायड्रेटिंग घटक आहेत का, हे तुमच्या ब्यूटी थेरपिस्टला जरूर विचारा.

शिवाय पोस्ट फेशियल केअर तुम्ही घेताय का? पोस्ट फेशियल केअर घेतल्याने फेशियलचा इफेक्ट जास्त दिवस टिकून असतो. म्हणजे फेशियल केल्यावर निदान दोन दिवस साबण अथवा फेस वॉश वापरायचा नाही. सन स्क्रीन जरूर लावायचे. रोज त्वचा ऑइल किंवा क्लिन्सिंग मिल्कने क्लीन करून भरपूर हायड्रेटिंग सीरम लावावे.

आठवड्यातून एकदा स्क्रब करून नरीशिंग हायड्रेटिंग पॅक लावावा. पाणी भरपूर प्यावे. सारखा चेहरा धुणे टाळावे, एकदा सकाळी अन् एकदा रात्री धुवावा. झोपायच्या आधी सीटीएम जरूर करावे. वरील गोष्टी फॉलो केल्यात, तर तुमचा फेशियलचा इफेक्ट नक्कीच जास्त दिवस टिकून राहील, शिवाय त्वचादेखील रुक्ष होणार नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com