

Thalapathy Vijay’s Fitness Secret
esakal
Thalapathy Vijay’s Daily Fitness Diet: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकीय नेते थलपती विजय (Thalapathy Vijay) हे त्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि अद्भूत डान्स मूव्ह्ससोबतच त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही, म्हणजेच वयाच्या ५२ व्या वर्षीही ते प्रचंड फिट अन् तरुण दिसतात.
अनेक चाहत्यांना प्रश्न पडतो की विजय इतके कडक डाएट फॉलो करतात का? पण, त्यांचे वैयक्तिक फिटनेस ट्रेनर नरेश कुमार (Naresh Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कोणतेही अत्यंत कडक (Restrictive) डाएट पाळत नाहीत. ते अत्यंत साधे, घरगुती आणि 'पोर्शन कंट्रोल' (Portion Control - मर्यादित प्रमाणात खाणे) या सूत्रावर आधारित अन्न घेतात.