हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम व आषाढी एकादशी एकाच दिवशी येणार आहेत. सहा जुलैला आषाढी एकादशी व मोहरम आहे.
कोल्हापूर : नव्या वर्षाची (New Year 2025) चाहूल लागताना दिनदर्शिकेवर सण कधी, कोणत्या तारखेला येतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले असते. विशेषतः गणेशोत्सव (Ganesh Chaturthi), नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे मोठे सण कोणत्या महिन्यात येतात, हे आवर्जून पाहिले जाते. २०२५ या नव्या वर्षात सर्वच सण सरासरी दहा ते बारा दिवस आधीच येत आहेत. लाडक्या गणरायाचे आगमन एरवी सप्टेंबर महिन्यात होते, तर यंदा ऑगस्ट महिन्यात गणपतीबाप्पांचे घरोघरी आगमन होणार आहे.