Dog Care Tips : तुमच्या लाडक्या पेट्सची काळजी असेल, तर घरात आजिबात लावू नका ही झाडं.. श्वानांना आहे मोठा धोका!

तुमच्या लाडक्या पेट्सची काळजी असेल, तर घरात आजिबात लावू नका ही झाडं
Dog Care Tips : तुमच्या लाडक्या पेट्सची काळजी असेल, तर घरात आजिबात लावू नका ही झाडं.. श्वानांना आहे मोठा धोका!

झाडे आणि वनस्पती केवळ सुंदर दिसत नाहीत तर ते आपले शरीर निरोगी ठेवण्यास देखील मदत करतात. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, ज्यातून आपण श्वास घेऊ शकतो हे सर्वांना माहीत आहे. परंतु, तुमच्या घरात श्वान असल्यास, तुमच्या घरासाठी रोपं निवडताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. कारण काही अतिशय सुंदर दिसणारी झाडे तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांसाठी विषारी ठरू शकतात.

कोरफड

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे, जी मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु अनेक पोषक घटकांव्यतिरिक्त, त्यात सॅपोनिन आणि अँथ्राक्विनोन हे दोन घटक असतात, जे श्वानांसाठी विषारी ठरू शकतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या पाळीव प्राण्याने चुकून कोरफडीचा गर चघळला तर तो आजारी पडू शकतो.

ट्यूलिप

रंगीबेरंगी ट्यूलिप फुले तुमची बाग सुंदर बनवतात. पण जर तुमच्या घरात श्वान असेल तर हे रोप लावण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा. त्यात टुलीपलिन ए आणि बी असते, जे श्वानांसाठी विषारी ठरू शकतात.

स्नेक प्लांट

हे एक अतिशय सुंदर हाउस प्लांट आहे, तुम्ही ते तुमच्या लिव्हिंग रूमच्या कोपऱ्यात लावू शकता. पण जर तुमच्या घरात श्वान असेल तर तो रोपापासून दूर राहील याची खात्री करा. कारण त्यात सॅपोनिन असते, त्यामुळे ही पाने खाल्ल्यानंतर श्वानांना उलट्या होतात आणि चक्कर येते.

हिबिस्कस

पूजेमध्ये सुंदर हिबिस्कस फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय त्याचे सेवन आरोग्यासाठीही चांगले मानले जाते. परंतु हे श्वानांसाठी विषासारखे आहे, म्हणून ते आपल्या पेटपासून दूर ठेवणे खूप महत्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com