लग्नाचं नातं रक्ताचं नसलं, तरी 'आयुष्यभर' टिकतं; पण..

Partner
Partneresakal
Summary

लग्नाचं नातं रक्ताचं नसलं, तरी आयुष्यभर टिकतं. म्हणूनच, आपली जबाबदारी असायला हवी, की आपण हे नातं इतकं सुंदर बनवतो.. जे संपूर्ण आयुष्य एक सुंदर 'प्रवास' बनतं.

लग्नाचं नातं रक्ताचं नसलं, तरी आयुष्यभर टिकतं. म्हणूनच, आपली जबाबदारी असायला हवी, की आपण हे नातं इतकं सुंदर बनवतो.. जे संपूर्ण आयुष्य एक सुंदर 'प्रवास' बनतं. तुमच्या जोडीदाराशी तुमच्या नात्याचा पाया हा प्रेम आणि विश्वासावर आधारित आहे. अशा परिस्थितीत, लहान चुका तुमच्या नात्यात मोठे गैरसमज निर्माण करू शकतात. म्हणून, एखाद्यानं हे नातं मोठ्या काळजीनं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे...

1. कोणत्याही नातेसंबंधात उत्तम समन्वय साधण्यासाठी त्याला वेळ देणं खूप महत्वाचं आहे. या आयुष्यभराच्या नात्यातही तुम्ही वेळ देण्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही कितीही व्यस्त असलात, तरी तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी थोडा वेळ काढा आणि तुमचे सुख-दुःख शेअर करा. वेळेच्या अभावामुळे संवादात 'अंतर' येतं आणि गैरसमज वाढतात.

2. तुम्ही तुमच्या जोडीदारावर कितीही प्रेम करा, पण नेहमी लक्षात ठेवा.. की, त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील आहे. जिथं त्याला स्वतःच्या इच्छेनुसार काही वेळ घालवायचा आहे. त्याच्या मित्रांसोबत त्याला मनातलं काहीतरी बोलायचंय किंवा इतर काही काम करायची आहेत. अशा स्थितीत, आपण आपल्या जोडीदाराला त्याचा वैयक्तिक वेळ देणं आवश्यक आहे.

Partner
'अरेंज मॅरेज'मध्ये मुलींना हमखास 'हे' प्रश्न विचारतात

3. दोघांपैकी कोणीही कधीही वर्चस्व गाजवू नये. यामुळे संबंध बिघडतात. तुम्ही दोघे आजीवन भागीदार आहात, हे लक्षात ठेवा आणि एकमेकांना आधार द्या. तुमच्या मर्यादा प्रत्येकाला माहीत आहेत, म्हणून बंधने लावू नका आणि अपेक्षा करा, की समोरची व्यक्ती फक्त तुमच्यानुसार काम करेल.

4. ज्या नात्यात आदर नाही, त्या नात्यात कटुता वगळता काहीच शिल्लक राहत नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमची पत्नी तुमच्या घरची जबाबदारी सांभाळते. हे देखील एक मोठं कार्य आहे, जे सहसा लोकांना आयुष्यभर लक्षात येत नाही. जर तुमची पत्नी गृहिणी असेल, तर तिचे काम लहान म्हणून घेऊ नका किंवा तिची थट्टा करू नका. तुम्ही जितका आदर मिळवण्यास पात्र आहात, तितकीच तुमची पत्नीही आहे.

5. 'विश्वास' हा पती-पत्नीच्या नात्याचा आधार आहे. जर तुमचा एकमेकांवर विश्वास नसेल, तर नात्यात काहीही शिल्लक नाही. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध ठेवायचे असतील, तर तुमच्या नात्यामधील विश्वासाला नेहमीच वरचढ ठरवत रहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com