Winter Foot Care Tips : हिवाळ्यात पायांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टीप्स

त्वचेसोबतच हिवाळ्यात पायांची देखील खास काळजी घेणे गरजेचे आहे.
Winter Foot Care Tips
Winter Foot Care Tipsesakal

Winter Foot Care Tips : हिवाळ्यात वातावरणात अनेक बदल होतात. त्यामुळे, या थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची, त्वचेची आणि केसांची खास काळजी घ्यावी लागते. वातावरणातील थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडू लागते.

त्वचेसोबतच हिवाळ्यात पायांची देखील खास काळजी घ्यावी लागते. पायाच्या टाचांची त्वचा अधिक नाजूक असते. त्यामुळे, थंडीत टाचांना भेगा पडणे, पायांची त्वचा कोरडी पडणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, हिवाळ्यात पायांची खास काळजी घेणे, हे देखील गरजेचे आहे.

आज आपण हिवाळ्यात पायांची काळजी कशी घ्यायची? त्या संदर्भातल्या काही सोप्या टीप्स जाणून घेणार आहोत.

Winter Foot Care Tips
Winter Skin Care : हिवाळ्यात घरच्या घरी बनवा 'हे' खास फेस सीरम्स, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

नखांची घ्या काळजी

एका बादलीत किंवा टबमध्ये गरम पाणी घ्या. यात तुम्ही साबणाचा फेस, शॅंम्पू मिक्स करू शकता. यासोबतच लिंबाचा रस देखील यात मिसळू शकता. आता या पाण्यामध्ये तुमचे दोन्ही पाय भिजवा. कोमट पाण्यात पाय भिजवल्यामुळे नखे आणि टाचांची मृत त्वचा मऊ होण्यास मदत होते.

यामुळे, पायांची नखे देखील सहज कापली जातात आणि पायांची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. पायांची नखे कापताना तुम्ही चुकूनही क्युटिकल्स कापू नका.

टाचांना मॉईश्चराईझ करा

कोमट पाण्यात पाय भिजवल्यानंतर ते कोरड्या नॅपकिनच्या मदतीने पुसून घ्या. त्यानंतर, टाचांची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी प्युमिक स्टोनच्या मदतीने हलक्या हाताने घासून घ्या. त्यानंतर, पाय पुन्हा धुवून स्वच्छ करा.

त्यानंतर, पाय कोरडे करून घ्या आणि पायांना मॉईश्चरायझर करण्यासाठी फ्रूट क्रीमचा वापर करा. यामुळे, पाय मऊ राहण्यास मदत होईल.

दिवसभर पायांमध्ये शूज घालू नका

तुम्ही दिवसभरात जे शूज किंवा चप्पल घालणार असाल ते जास्त घट्ट नसावेत. कारण, शरीराच्या भागांवर सतत दबाव पडल्यास रक्तपरिसंचरणात समस्या उद्भवण्याचा धोका असतो.

त्यामुळे, जास्त वेळ शूज घालू नका. तुमचे पाय जितका वेळ हवेशीर ठेवता येतील, तितका वेळ हवेशीर ठेवण्याचा प्रयत्न करा. थंडीच्या दिवसांमध्ये पायांना नरम ठेवण्यासाठी शूज आवर्जून घालण्यावर भर दिला जातो.

मात्र, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही दिवसभर त्या शूजमध्ये रहावं. त्यामुळे, दिवसभरात मध्येमध्ये ब्रेक घेऊन पाय हवेशीर ठेवण्याचा प्रयत्न करा. जे लोक खूप चालतात किंवा ज्यांना जास्त वेळ उभे रहावे लागते. अशा व्यक्तींनी जाड तळवे आणि कमी टाच असलेले बूट घालावेत. यामुळे, पायांना आराम मिळण्यास मदत होईल.

Winter Foot Care Tips
Winter Makeup Tips : हिवाळ्यात नैसर्गिक आणि नॉन ऑयली मेकअप लूक हवाय? मग, 'या' टीप्स करा फॉलो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com