Home Remedies For Stretch Marks : स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

स्ट्रेच मार्क्स ज्याला 'स्ट्राय' म्हणून ही ओळखले जाते.
Home Remedies For Stretch Marks
Home Remedies For Stretch Marksesakal
Updated on

Home Remedies For Stretch Marks : आई होणे हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो. या दरम्यान महिलेच्या शरीरामध्ये असंख्य बदल होत असतात. बाळाला जन्म दिल्यानंतर काही छोटया-मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. या सगळ्यांमध्ये प्रामुख्याने स्ट्रेच मार्क्सचा समावेश असतो.

गरोदरपणात पोटातील बाळाचा आकार ज्या प्रमाणे वाढत जातो. त्याप्रमाणे त्वचा ताणायला लागते. त्यामुळे, पोटाच्या त्वचेवर स्ट्रेच मार्क्स दिसतात. स्ट्रेच मार्क्स ज्याला 'स्ट्राय' म्हणून ही ओळखले जाते. याला लांब पातळ रेषा असे ही म्हटले जाते.

हे स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. महागड्या क्रीम्सचा ही वापर करतात. परंतु, यावर अनेक घरगुती उपाय केले जाऊ शकतात. आज आपण स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी केल्या जाणाऱ्या काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत.

कोरफड

कोरफड ही आपल्या आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. कोरफडमध्ये मॉईश्चरायझिंग गुणधर्मांचा समावेश आढळून येतो. कोरफडमुळे त्वचेतील कोलेजनच्या विकासाला मदत होते. कोरफडीमधील हेच गुणधर्म स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

कोरफडीचा उपाय करण्यासाठी २ चमचे कोरफड जेल किंवा कोरफडचा गर घ्या. आता त्यामध्ये १ चमचा व्हिटॅमिन ई तेल मिक्स करा. हो दोन्ही घटक चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता हे मिश्रण स्ट्रेच मार्क्स् असलेल्या जागेवर १ तासासाठी लावा. त्यानंतर धुवून टाका.

Home Remedies For Stretch Marks
Pregnancy Travel Tips : गरोदरपणात प्रवास करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक आढळून येतात. त्यामुळे, त्वचा, आरोग्य आणि केसांसाठी लिंबाच रस फायदेशीर ठरतो. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी लिंबाचा रस प्रभावीपणे काम करते.

हा उपाय करण्यासाठी २ चमचे लिंबाचा रस घ्या, त्यामध्ये २ चमचे पाणी मिक्स करा. आता हे मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर लावा. १५ मिनिटे तसेच ठेवा, नंतर धुवून टाका. त्यानंतर, त्वचेवर मॉईश्चरायझर लावायला विसरू नका.

Home Remedies For Stretch Marks
Exercise During Pregnancy: गरोदर महिलांनी व्यायाम करावा का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा उपाय हा अनेक समस्यांवर केला जातो. बेकिंग सोड्यामध्ये एक्सफोलेटिंगचे गुणधर्म असल्यामुळे त्याचा स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो.

हा उपाय करण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घ्या. आता हे दोन्ही घटक चांगल्या प्रकारे एकत्र करा. त्यानंतर, हे मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर लावा. २५-३० मिनिटांनंतर धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान २ वेळा तरी हा उपाय करा.

Home Remedies For Stretch Marks
Pregnancy Tips : गरोदरपणात काम करताना काय काळजी घ्यावी? वर्किंग वुमनसाठी ‘या’ खास टिप्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com