Reels Addiction : रील्स पाहण्याचं लागलंय व्यसन? 'या' टिप्स येतील कामी

आपल्यातील कित्येक जणांना सतत रील्स पाहण्याची वाईट सवय लागली आहे.
Reels Addicton
Reels Addicton esakal

Reels Addiction : आजकाल सोशल मीडियाचे चांगलेच फॅड वाढले आहे. सोशल मीडियाचे अनेक फायदे जरी असले तरी त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणात केला जातोय? हे देखील महत्वाचे आहे. इन्स्टाग्रामची लोकप्रियता मोठ्यांपासून लहानांपर्यंत आहे. एवढी याची क्रेझ वाढली आहे.

अनेक जण ५ मिनिटांसाठी मोबाईल हातात घेतात आणि रील्स स्क्रोल करत बसतात. हे रील्स पाहताना तासनतास उलटून जातात हे देखील अनेकांच्या लक्षात येत नाही. खरं तर यामुळे कामाकडे लक्ष लागत नाही, नुकसान तर होतेच आणि आरोग्याची देखील हानी होते.

आपल्यातील कित्येक जणांना सतत रील्स पाहण्याची वाईट सवय लागली आहे. ही सतत रील्स पाहण्याचे व्यसन सोडवण्यासाठी आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. कोणत्या आहेत या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.

Reels Addicton
Instagram Reels : तरुणाई इन्स्टाग्राम रिल्सच्या मोहात, मनोरंजनाकडे कल यूट्यूबकडे पाठ

रील्सचे व्यसन सोडवण्यासाठी फॉलो करा या टिप्स -

  • रील्स पाहण्याच्या वाईट सवयींपासून सुटका मिळवायची असेल तर सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये एक अलार्म सेट करा. ठराविक वेळेसाठीच मोबाईलचा वापर करा. १५-२० मिनिटे पूर्ण झाली की, तुमच्या मोबाईलचा तुम्ही सेट केलेला अलार्म वाजेल. हा अलार्म झाला की, लगेच मोबाईल दूर ठेवून द्या.

  • तुम्ही फक्त मनोरंजन किंवा टाईमपास म्हणून रील्स पाहत असाल तर, वेळीच सावध व्हा आणि तुमच्या मनोरंजनाचे स्त्रोत बदला.

  • जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर, तुम्ही रील्स पाहण्याऐवजी तुमच्या मित्र-मैत्रिणींना भेटा, कुटुंबासोबत वेळ घालवा. तुमच्याकडे पाळीव कुत्रा-मांजर असेल तर त्यांच्यासोबत वेळ घालवा.

  • विविध प्रकारचे खेळ खेळा, तुमचे छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही स्वत:ला मोबाईलपासून दूर ठेवू शकता.

  • विकेंडमध्ये तुमचा मोबाईल स्वत:पासून दूर ठेवा. कुठेतरी बाहेर फिरायला जा, निसर्गाच्या सानिध्यात जा. तुमच्या कुटुंबियांसोबत घरात चित्रपट पहा. छान पुस्तक वाचा, बागकाम करा. यामुळे, तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि तुम्ही सुट्टीचा आनंद घेऊ शकाल. या सगळ्यामुळे तुम्ही मोबाईलपासून दूर रहालं.

  • रील्स पाहण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी ट्रिगर करतात किंवा ज्या गोष्टी तुम्हाला रील्सची आठवण करून देतात त्या गोष्टी बंद करा. उदा. जर तुम्हाला त्या संदर्भात नोटिफिकेशन्स येत असतील तर ते पूर्णपणे बंद करा. यामुळे, तुम्ही रील्सपासून दूर राहू शकालं.

  • आता या सर्व गोष्टी करूनही जर तुमचे रील्स पाहण्याचे व्यसन सुटत नसेल तर तुम्ही ते अ‍ॅप्लिकेशन तुमच्या मोबाईलमधून काढून टाका.

Reels Addicton
Addiction Of Watching Reel : रिल्सनं सगळ्यांनाच वेड लावलंय! तुम्हाला हे गंभीर आजार तर नाहीत ना झाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com