वैवाहिक आयुष्यात 'या' गोष्टींवर तुमचं नियंत्रण आहे का?

वैवाहिक आयुष्यात 'या' गोष्टींवर तुमचं नियंत्रण आहे का?

लग्न हे एक अतुट नातं मानलं जात. पण हे नातं अतुट राहावे म्हणून दोघांनाही प्रयत्न करावे लागतात. कित्येकदा लग्नानंतर नात्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद होऊ लागतात. कित्येकदा अशा वादांमुळे झालेले गैरसमज मोठ्या वादाला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. तुम्हाला लग्नानंतर तुमचे नाते टिकवायचे असेल तर स्वत:मधील काही गोष्टी बदलाव्या लागतील. वाद होऊ नये म्हणून काही सवयी बदलाव्या लागतील. कोणत्याही नात्यामध्ये तुमच्या हातात काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही बदलू शकता किंवा नियंत्रित करू शकता आणि काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही कधीही बदलू शकत नाही किंवा नियंत्रित करू शकतात. नातं टिकविण्यासाठी तुम्हाला या कोणत्या गोष्टी आहेत हे माहित असणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊ या...कोणत्या गोष्टी आहेत त्या.

तुमच्या कोणत्या गोष्टी नियंत्रित करू शकता किंवा बदलू शकता

तुमचे संवाद कौशल्य -

तुम्ही कोणाशी कधी, कसे बोलता यावर तुम्हाला निंयत्रण ठेवता येऊ शकते. कधी एखादी गोष्ट पटली नाही तरी चीडचीड न करता सौम्य शब्दात आणि शांतपणे आपले मत व्यक्त करू शकता. तुम्हाला समोरच्याकडून एखादे काम करून घ्यायचे असेल तर तुम्ही नम्रपणे सांगू शकता. तुमच्या संवाद कौशल्यावरच समोरच्यासोबत तुमचे नाते कसे असेल हे ठरते. त्यामुळे तुमच्या संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील.

तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबासोबत चांगले नाते तयार करू शकता.

कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे कुटुंब महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही व्यक्तीसोबत नाते जोडायचे असेल तर तुम्हाला त्याच्या कुटुंबासोबतही नाते जोडावे लागते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतच त्याच्या कुटुंबासह कसे वागता हेही महत्त्वाचे असते. त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत तुमचे छान मैत्री किंवा नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल

कोणत्याही नात्यामध्ये व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवता आले पाहिजे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टी एकत्र केल्यास नाते खराब होऊ शकते.व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. त्यामुळे नाते टिकून राहते.

घरातील छोट्या छोट्या कामात मदत करा

लग्नानंतर नात्यातील जबाबदाऱ्या वाढतात. नात्यामध्ये तुम्ही जबाबदाऱ्या वाटून घेऊ शकता. छोट्या कामात एकमेकांना मदत करळू शकता

-तुमच्या लैंगिक आयुष्यात सातत्य राखणे

संभोग/शरीरसंबंध ही वैवाहिक आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. शारीरिक जवळीक ही गोष्टही महत्त्वाच्या आहेतच. पण दीर्घकालीन नातेसंबंधांमध्ये शरीरसंबंधांचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळे नात्यामध्ये शारीरिक संबधामध्ये सातत्य राखणे गरजचे ठरते.

तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी

तुमच्या आणि जोडीदाराच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये खूप फरक असतोय. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी नियंत्रित करू शकता.

नात्यामध्ये तुम्ही बदलू शकत नाही किंवा नियंत्रित करू शकत नाही अशा गोष्टी

तुमच्या जोडीदाराची कुटुंबाला हातळण्याची पध्दत :

प्रत्येक व्यक्ती हा इतरांपासून वेगळा असतो. प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती आणि वातावरण देखील वेगळे असते. प्रत्येक व्यक्तीची कुटुंबासोबत वागण्याची पध्दत खूप वेगळी असते. लग्नानंतर तुमचा जोडीदार त्याच्या कुटुंबासोबत कसा वागतो हे तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही ते बदलू शकत नाही. अशा वेळी जोडीदाराला समजविण्यापेक्षा किंवा वाद घालण्यापेक्षा तुम्ही त्याला समजून घ्यायला हवे. त्यामुळे तुमच्यामध्ये वाद होणार नाही आणि नातेही टिकून राहील.

तुमच्या जोडीदाराची संवादकौशल्य

व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. तुमच्या जोडीदाराचा स्वभाव तुमच्यापेक्षा वेगळा असतो. तुमच्या जोडीदाराचे संवाद साधण्याची पध्दत देखील वेगळी असू शकते, कदाचित तुम्हाला ती सुरवातील समजणार नाही किंवा पटणार नाही. पण त्यामुळे जोडीदारासोबत वाद घालण्यापेक्षा त्याला काय म्हणायचे आहे? हे जाणून घ्या. तुमच्या जोडीदाराचे संवाद कौशल्य जर कमी पडत असतील तर त्याला दोष देण्यापेक्षा किंवा बदलण्यापेक्षा तुम्ही त्याला समजुन घेणे गरजेचे असते. तुम्ही तुमच्या जोडीदारा काही गोष्टी प्रेमाने समजावून सांगु शकता. त्यामुळे तुमच्यामध्ये वाद होणार नाही आणि नाते अधिक दृढ होईल.

तुमच्या जोडीदाराचा मूड

तुमच्या जोडीदाराचा स्वभाव नक्की कसा आहे हे समजून घेणे थोडे अवघड असते. लग्नानंतर किंवा आधी तुमचा जोडीदाराच्या मनात काय सुरू आहे, त्याचा मुड कसा आहे तुम्हाला समजणे सोपे नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराचा मूड कसा आहे हे समजू शकत नसेल तरी तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. तुमचा जोडीदार काही कारणामुळे चीड चीड करत असेल किंवा नाराज असेल आणि तुम्हाला त्याचे कारण समजत नसेल त्यावेळी तुम्ही त्याला समजून घेण्याची गरज असते. तुम्ही काय झाले याचे अंदाज बाधंत बसण्यापेक्षा थेट जोडीदाराशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्याला काही वेळ शांत होण्यासाठी वेळ द्या. तो स्वत:हून येऊन तुम्हाला सगळ काही सांगेल.

तुमच्या जोडीदाराला स्वत:साठी वेळ द्या

प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा असा वेळ हवा असतो. तुमच्या जोडीदाराने हा वेळ कसा घालवाव हे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. प्रत्येकला स्वत:ला हवा तसा वेळ घालविण्याचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही त्यात कसलाही हस्तक्षेप करू नका. उलट गरज असेल तेव्हा तुमच्या जोडीदाराला असा वेळ द्या. नात्यामध्ये थोडी स्पेस वैयक्तिक आयुष्यासाठी द्या. त्यामुळे तुमचा जोडीदार आनंदी राहू शकेल आणि तुमचे नाते आणखी सुंदर होऊ शकते.

जोडीदाराची संभोगाची इच्छा तुम्ही नियंत्रित करू शकत नाही.

वैवाहिक आयुष्यात लैंगिक संबध खूप महत्त्वाचे असतात. कित्येकदा वैवाहिक आयुष्यात संभोगाची इच्छेवरून समस्या निर्माण होऊ शकते. अशा प्रकारची इच्छा असणं यात काहीही वावगं नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या लैंगिक भावनाही वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतात. तुमच्या नात्यात जवळीक ठेवण्यासाठी इच्छा दोघांनीही ठेवली पाहिजे. लैंगिक मार्गदर्शक, थेरपिस्ट यांच्याकडून प्रोफेशनल गायडन्सही घेऊ शकता. लक्षात ठेवा, इच्छेवरच तुमचे नाते टिकून असते.

तुमच्या जोडीदाराच्या खाण्यापिण्याच्या सवयींसाठी सल्ला द्या पण..

तुमच्या आणि जोडीदाराच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये खूप फरक असू शकतो. पण काहीवेळा हा फरक छोट्या वादांना कारणीभूत ठरू शकतो. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी नियंत्रित करू शकता पण,जोडीदाराच्या सवयी बदलू शकत नाही. तुम्ही त्यांना सल्ला देऊ शकता की त्यांच्यासाठी योग्य आहार किंवा वेळा केव्हा आहे पण त्यांच्या सवयी तुम्ही बदलू शकत नाही. पण तुमची मते त्यांच्यावर लादू शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com