कतरीनाच्या हातावर मेहंदी काढणारी आहे कोण?

कतरिना विकी कौशलच्या नावाची मेहंदी लवकरच काढणार आहे.
कतरीनाच्या हातावर मेहंदी काढणारी आहे कोण?

कतरीना कैफ (katrina kaif) आणि विकी कौशल (vicky-kaushalहे त्यांच्या ९ डिसेंबरला होणाऱ्या लग्नासाठी (marraige) राजस्थानला पोहोचले आहेत. तिथे त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. कतरिना विकी कौशलच्या नावाची मेहंदी लवकरच काढणार आहे.

कतरीनाच्या हातावर मेहंदी काढणारी आहे कोण?
लगीनघाई : कतरिना, विकीचा विवाह होणार दोन प्रकारात

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. दोघांनीही यावर चुप्पी साधली होती. पाहुण्यांची गेस्टलिस्ट, त्यांच्यासाठी घालण्यात आलेल्या अटी याचीही चर्चा झाली. पण दोघांपैकी कोणीही बोलायला तयार नव्हते. पण चार दिवसांपूर्वी रात्री १२.३० च्या सुमारास विकी कतरीनाच्या घरी स्पॉट झाला आणि त्याने छायाचित्रकारांना हसून पोझ दिली. त्यानंतर या बातमीवर शिक्कोमार्तब झाले. दुसऱ्यादिवशी कतरिना पांढऱ्या रंगाच्या साडीत आईसह विकीच्या घरी गेली तेव्हाही तिचे हास्य बरेच काही सांगून जात होते. अखेर काल ते दोघे राजस्थानला रवाना झाले. तेव्हा विकीच्या साध्या लूकने तरूणाईची मने जिंकली.

कतरीनाच्या हातावर मेहंदी काढणारी आहे कोण?
विकी-कतरिना लग्नमंडपात पोहोचणार थेट हेलिकॉप्टरमधून
कतरीनाच्या हातावर मेहंदी काढणारी आहे कोण?
असा असेल विकी-कतरिनाच्या लग्नातील मेन्यू; पाहुण्यांसाठी पदार्थांची चंगळ

आता त्यांचे लग्नविधी सुरू होणार आहेत. ते कोणत्या पद्धतीने लग्न करतील हेही अजून गुलदस्यात आहे. मात्र सर्वात पहिले फंक्शन रंगणार आहे ते मेहंदीचे. कतरिनावर लावण्यात येणारी मेहंदी खास असणार आहे. ती सोजत, जोधपूर, राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून आणली गेली आहे. ही मेहंदी हानिकारक रसायनांचा वापर न करता नैसर्गिकरित्या तयार केली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट वीणा नागदा ही कतरिनाच्या हातावर मेहंदी काढणार आहे. याआधी वीणा नागदा यांनी श्रीदेवी पासून आताच्या आघाडीच्या दिपीका पादुकोण, सोनम कपूर, मीरा कपूर, वरूण धवनची बायको नताशा, नीता अंबानी, इशा अंबानी आदींच्या हातावर मेहंदी काढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com