असा असेल विकी-कतरिनाच्या लग्नातील मेन्यू; पाहुण्यांसाठी पदार्थांची चंगळ | Vicky Katrina Wedding | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vicky Kaushal, Katrina Kaif

असा असेल विकी-कतरिनाच्या लग्नातील मेन्यू; पाहुण्यांसाठी पदार्थांची चंगळ

अभिनेता विकी कौशल Vicky Kaushal आणि कतरिना कैफ Katrina Kaif यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना आजपासून (७ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. बॉलिवूडमधल्या या सर्वांत मोठ्या लग्नसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या लग्नसोहळ्यातील प्रत्येक बारिकसारिक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विकी-कतरिनाच्या लग्नाचा मेन्यू हा भारतीय आणि पाश्चिमात्य पदार्थांनी परिपूर्ण असेल. विकी आणि कतरिनाने पाहुण्यांची यादी आणि विशेषत: भारताबाहेरील कुटुंबातील सदस्यांना लक्षात घेऊन मेन्यूमधील पदार्थ निश्चित केले आहेत. Vicky Katrina Wedding

'बिग फॅट वेडिंग'साठी विकी-कतरिनासह कुटुंबीय राजस्थानला पोहोचले आहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूर इथल्या हॉटेल सिक्स सेन्सेस बरवारा फोर्टमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. 'इंडिया टुडे'नं दिलेल्या वृत्तानुसार जेवणाच्या मेन्यूमध्ये कचोरी, चाट स्टॉल, कबाब आणि पारंपारिक राजस्थानी पदार्थांचा समावेश असेल.

हेही वाचा: "माझे सर्व प्लॅन्स उद्ध्वस्त झाले"; घटस्फोटावर समंथाची प्रतिक्रिया

विकी-कतरिनाच्या लग्नातील जेवणाचा मेन्यू-

कचोरी, दही भल्ला आणि फ्युजन चाटचे स्टॉल्स

उत्तर भारतीय पदार्थ ज्यात कबाब आणि फिश प्लॅटरचा समावेश असेल

१५ विविध डाळींपासून बनवलेला दाल बाटी चुरमा

इटलीतील शेफने बनवलेला टिफनी वेडिंग केक

पान, पाणीपुरी आणि इतर भारतीय पदार्थांसाठी स्वतंत्र स्टॉल

विकी आणि कतरिना सिक्स सेन्स फोर्ट बरवारा, सवाई माधोपूर इथं लग्न करणार आहेत. १४व्या शतकात याची बांधणी झाली असून आता ते आलिशान रिसॉर्टच्या स्वरुपात पहायला मिळतं. विकी-कतरिनाच्या लग्नसोहळ्यात पाहुण्यांसाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. पाहुण्यांच्या यादीत करण जोहर, फराह खान, कबीर खान, मिनी माथूर, रोहित शेट्टी, नेहा धुपिया, अंगद बेदी, गुरुदास मान यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

Web Title: Katrina Kaif Vicky Kaushal Wedding Have A Look A The Food Menu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top