का रे दुरावा... नात्यात कायमचा दुरावा आल्यावर या 3 गोष्टींचा विचार करू नका... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

husband bite his wife on her wrist gets divorce
का रे दुरावा... नात्यात कायमचा दुरावा आल्यावर या 3 गोष्टींचा विचार करू नका...

का रे दुरावा... नात्यात कायमचा दुरावा आल्यावर या 3 गोष्टींचा विचार करू नका...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची घटना असते. काहींचे लग्न टिकते पण काही जोडप्यांमध्ये दुरावा येतो. पण नातं टिकविण्यासाठी अनेकजण एडजस्टमेंट करत असतात. ती नाही जमली किंवा खूपच ताण येत असेल तर मात्र वेगळं व्हायचा निर्णय घेतला जातो. आणि या नात्याची परिणिती घटस्फोटात होते.

मात्र अशाप्रकारे नाते तुटल्यावर दोघेहीजण वेदना, दु:ख, नकारात्मक भावनेतून जात असतात. त्यामुळे ते काही काळ एकटं राहण्याचा विचार करतात. पण हा एकटं राहण्याचा काळ त्यांच्यासाठी खूप त्रासदायक असतो. त्यामुळे यातून बाहेर पडणेही गरजेचे असते. मात्र हे करताना तीन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

हेही वाचा: बिस्किटवाल्याचं प्रेमपत्र; प्रिय Marie, तुझाच Tiger

आयुष्य इथेच संपत नाही- घटस्फोट झाल्यावर त्रास होणे ही अगदी साहजिक गोष्ट आहे. पण या सगळ्यातून बाहेर पडायला तु्म्हाला वेळ लागणार आहे. याचा अर्ध तुमचं आयुष्य संपलं असा होत नाही. तुम्हाला नवं आयुष्य सुरू करायला हवं. तशी संधी तुम्हाला तुमचं आयुष्य देत असतं. 

लग्न ही चूक नाही- घटस्फोट झाल्यावर लग्न करून चूक केली, घाई केली असे एक ना अनेक प्रश्न मनात येत असतात. पश्चातापाची भावना मनाला छळत असते. पण असा विचार करून स्वतला त्रास करून घेणे चुकीचे आहे. चूक तुमच्या एकट्याची नसते. दोघांचे विचार, मत अजिबात पटत नसल्याने आधीच ताण आलेला असतो अशावेळी नातं पुढे न नेण्याचा विचार होतो. पण लग्न चुकीचं आहे असे अजिबात समजायचे नसते. कदाचित त्यातून शिकून तुम्हाला सुधारणेला वाव मिळतो. 

नातं वाचविण्याचा प्रयत्न- कधी कधी लग्नानंतर जोडीदाराच्या काही गोष्टी प्रकर्षांने समोर येतात. त्याचा त्रास होऊ लागतो. कधीतरी असह्य होतं तेव्हा वेगळं होण्याचा निर्णय घेतला जातो. पण दरम्यान तुम्ही नातं टिकविण्याचा प्रयत्न केलेला असतो. तरी वेगळं होता. मात्र जर जर घटस्फोटानंतर  तुम्ही नातं वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असं वाटत असेल तर याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशावेळी आधीच्या नात्यात काय चुका केल्या याचा तुम्ही विचार करणं गरजेचं असतं.

हेही वाचा: लग्न करताय? सहा महिने आधीच करा 'या' महत्त्वाच्या मेडिकल टेस्ट

loading image
go to top