मुलांना का आवडते आपल्यापेक्षा जास्त वयाची जोडीदार? वाचा तीन कारणे

मोठ्या वयाची स्त्री अधिक प्रौढ असते
Priyanka chopra husband nick Jonas
Priyanka chopra husband nick JonasTeam esakal

विकी- कतरीना(vicky -katrins) , प्रियंका- निक, अभिषेक-ऐश्वर्या या जोडप्यातील (Partner) तिचे वय(Age) त्याच्यापेक्षा जास्त आहे. बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत की ज्यांनी कमी वयाच्या मुलांसोबत लग्न केले आहे. पण हे फक्त त्याच इंडस्ट्रीत चालते का?तर नाही. आता अनेक मुलं- मुली असे जोडीदार निवडत आहेत. त्यात काहींनी प्रेमविवाह केलेला असतो तर काहींनी ठरवून असे लग्न केलेले असते.

याबाबत, भाटिया हॉस्पिटलच्या मानसोपचारतज्ज्ञ म्हणाल्या की, मोठ्या वयाची स्त्री अधिक प्रौढ आणि तरूण मुलींइतकी प्रतिक्रियाशील नसते. ती अधिक सहनशील आणि नातेसंबंध अधिक चांगल्या प्रकारे टिकवून ठेवण्यास सक्षम असते. ती त्याला त्याच्या दोषांसह स्विकारते. कदाचित अनुभवाने ती अधिक सुज्ञ असल्याने त्याच्या दोषांवर ती चांगले सल्ले देऊ शकते, असे शेठ म्हणतात

Priyanka chopra husband nick Jonas
यशस्वी लग्नासाठी दोघांच्या वयामध्ये हवं किती अंतर?
Vicky Kaushal- Katrina Kaif wedding
Vicky Kaushal- Katrina Kaif weddingesakal

ही आहेत कारणे

मॅच्युरिटी

वयाने मोठ्या असलेल्या मुलींची मॅच्युरिटी मुलांना आवडते. त्या मुलांची अधिक काळजी घेतात. त्यांच्याकडे जास्त लक्ष देतात. त्यांच्यावर जास्त प्रेम करतात. शरीरसंबंधांबाबत त्या पुढाकार घेतात. बहुतेक मुलांना मोठ्या वयाची मुलगी आवडते.

साधे राहणीमान

वयाने मोठ्या असलेल्या मुली साध्या राहतात. कमी मेकअप करतात. स्टायलिश पण सिलेक्टीव्ह गोष्टी घेणे त्यांना आवडते. सहसा शॉ ऑफ करणे त्यांना आवडत नाही. म्हणूनच मुले अशा मुलींकडे जास्त आकर्षित होतात.

जबाबदारीची जाणीव

वयाने मोठ्या असलेल्या मुली स्वत:च्या पायावर उभ्या असतात. त्यांना पैसे पुरवून वापरायला आणि साठवायला आवडतात. जबाबदारीची जाणीव त्यांना अधिक असते. कुटुंबाचीही काळजी त्या चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. तसेच त्यांचा खंबीरपणा मुलांना आवडत असल्याने आता मुले वयाने मोठ्या अससलेल्या मुली पार्टनर म्हणून शोधण्याकडे लक्ष देतात.

Priyanka chopra husband nick Jonas
Relationship Tips| ब्रेकअपनंतर नव्या नात्याची सुरुवात करताय? मग या चुका टाळा
Abhishek Bachchan,Aishwarya Rai-bachchan
Abhishek Bachchan,Aishwarya Rai-bachchanGoogle

हे लक्षात ठेवा

वयाच्या फरकापेक्षा (Age Diffrence) जोडीदारांचा लग्नाचा "इद्देश आणि निवडी" वर जास्त प्रमाणात भर असतो, यासाठी प्रथम तुमची वैयक्तिक निवड काय आहे ती गरजेची आहे. जर तुमचा जोडीदार वयाने मोठा असेल तर त्याला समजून घेणे, महत्वाचे असते. त्याच्या पालकांशी तुमचे असलेले नाते आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची पद्धतही यासाठी फार मह्त्वाची ठरते. लग्नानंतर तुम्ही एकमेकांसोबत कसे नाते निभावता, तिच्या प्रगल्भतेचा तुम्हाला त्रास होतो का? अशी अनेक आव्हाने तुम्हाला लग्नानंतर येऊ शकतात. त्यामुळे संभाव्य परिणाम समजून घेण्यास मदत करण्यासाठी प्रेमाव्यतिरिक्त विचार करणे हे तितकेच महत्त्वाचे घटक आहेत.

लैंगिक संबंधानंतर एकमेकांना मिठी मारून झोपण्याचे आहेत पाच फायदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com