Ratnakar Matkari Thriller Books : थ्रीलर गोष्टी आवडतात? मग 'या' कादंबऱ्या वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnakar Matkari Thriller Books

Ratnakar Matkari Thriller Books : थ्रीलर गोष्टी आवडतात? मग 'या' कादंबऱ्या वाचाच

सामान्य लोक आयुष्याच्या डार्क सिक्रेट कडे लवकर आकर्षित होतात; बहुदा हे मतकरींना खूप आधीच कळलं असावं; मतकरींनी लिखणातले खूप वेगवेगळे प्रकार अगदी सहज पणे हाताळले आहेत. एका बाजूला त्यांची खेकडा, जेवणावळ अशी भीती वाटायला भाग पाडणारी कहाणी तर दुसरी कडे छोट्या दोस्तांसाठी अलबत्या गलबत्या सारखं नाटक.

मतकरींचा जन्म 17 नोव्हेंबर 1938 मध्ये झाला. 1958 मध्ये मुंबई युनिव्हर्सिटी मधून इकॉनॉमिक्स ची डिग्री घेऊन त्यांनी पुढे वीस वर्ष बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. 1978 पासून, त्यांनी आपला वेळ केवळ चित्रपट आणि नाटकांच्या लेखन आणि निर्मिती/दिग्दर्शनासाठी वाहून घेतला. 17 मे 2020 रोजी मुंबईत त्यांचा कोविड - 19 मुळे मृत्यू झाला.

मतकरींनी कितीही वेगवेगळे प्रकार हाताळले असले तरी थ्रिलर कथा लिहिण्यात त्यांचा हात कोणीच धरु शकत नाही. ते एखादी गोष्ट एवढी सुंदर मांडतात की आपण ही गोष्ट खरंच समोर बघतो आहोत याचाच भास होतो.

हेही वाचा: Book Reading : स्ट्रेस आलाय? पुस्तकं वाचा अन् ताण घालवा

अशाच मतकरींच्या काही थ्रिलर कथा:

1. संदेह

आपण केवळ नियतीच्या हातातील बाहुले आहोत मतकरींचा हा कथा संग्रह हेच भासावतो; या कथासंग्रहात एकूण १० कथा आहेत. प्रत्येक कथा ही आपण कल्पना केल्याच्या पल्याडची आहे. मानवी मनाने खेळलेल्या खेळांची अनुभूती या कथा करून देतात.

2.खेकडा

जो चाव्याने डंख मारतो, प्रत्येक जीव त्याच्या चाव्याला घाबरतो तो 'खेकडा'. या संग्रहातील कथांची भीतीच वाचकाला दंश करेल अशी आहे. या संग्रहामध्ये कोणत्याही मानवी मनाचा ताबा घेण्याची आणि आपला थरकाप उडवण्याची क्षमता आहे. पण त्याच वेळी या कथा आपल्या जीवनातील मूळ सत्यापासून कधीच दूर जात नाहीत. या संग्रहात घडणाऱ्या घटना आपल्या आयुष्यातही घडू शकतात अगदी अशा आहेत.

हेही वाचा: Advance Booking : पोन्नियिन सेल्वनने विक्रम वेधाला टाकले मागे; पहाटेचे शो हाऊसफुल्ल

3. कबंध

ही कथा जीवनाच्या एका गूढ पैलूवर आधारित आहे. मृत्यू हे एक रहस्य आहे. मृत्यूच्या वेळी खरोखर काय होते? या प्रश्नाचे उत्तर आजवर कोणीही देऊ शकले नाही. मानवी शरीराच्या नाश कसा होतो हे जरी विज्ञान सांगू शकत असलं तरी माणूस म्हणजे फक्त शरीर नाही, त्यात मन आहे, आत्मा आहे, त्याला भावना आहेत, वासना आहेत… मृत्यूने ती नष्ट होतात का? की त्या इथेच राहतात? या विषयी ही कादंबरी बोलते.

4. निजधाम

काळी जादू, जंतर मंतर यावर बोलणारा हा कथासंग्रह आहे; यातली जेवणावळ, बोलवण आणि निजधाम सारख्या कथा अंगावर अगदी काटा आणतात, एखाद्या गोष्टीचा हव्यास आपल्या सोबत काय करू शकतो हे ह्यात प्रखर्शाने मांडलं आहे. जेवणावळ वाचल्यावर तर माणूस प्रचंड हादरतो.

5. फाशी बखळ

फाशी बखळ ही एका स्वतःवर नियंत्रण नसलेल्या माणसाची गोष्ट आहे; त्याच्या घरात सगळीकडे घळफासासाठी दोऱ्या आहेत. ज्या क्षणी त्याच्या डोळ्यांना कोणत्याही रूपात दोरी दिसते त्या क्षणी त्याला सर्वकाही आठवत आणि आपोआप त्याचे हात दोरीकडे वळतात. तो अविवेकीपणे वागतो आहे हे त्याला माहिती असूनही तो त्यावर ताबा ठेवू शकत नव्हता. अशा आशयाची ही थरारक कादंबरी आहे.

मतकरींच्या कथा कितीही वर्षे जुन्या असल्या तरीही, आजच्या काळाशी, आजच्या घटनांशी त्या मिळत्या जुळत्या असण, हा एक अतिशय महत्वाचा गुणविशेष आहे.

टॅग्स :bookswriters