Advance Booking : पोन्नियिन सेल्वनने विक्रम वेधाला टाकले मागे; पहाटेचे शो हाऊसफुल्ल

चेन्नईमध्ये पहाटे ४.३० वाजताचे शो हाऊसफुल्ल झाले आहेत
Movie Advance Booking News
Movie Advance Booking NewsMovie Advance Booking News
Updated on

Movie Advance Booking News हृतिक रोशन व सैफ अली खान यांचा चित्रपट विक्रम वेधा ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर मणिरत्नमचा ड्रीम प्रोजेक्ट पोन्नियिन सेल्वन-१ (PS-१) देखील प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. दोन्ही चित्रपटांची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. परंतु, पोन्नियिन सेल्वन-१ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पुढे असल्याचे दिसते.

सोमवारी सकाळपर्यंत दिल्लीसारख्या मोठ्या केंद्रांमध्ये पोन्नियिन सेल्वन-१चे आगाऊ बुकिंग सुरू झाले नाही. मात्र, साउथमध्ये चित्रपटाच्या शोचे बुकिंग जोरात सुरू आहे. चोल साम्राज्यावर आधारित चित्रपट किती चांगला आहे हे ट्रेलर पाहिल्यानंतरच समजते. तमिळमध्ये बनलेला पोन्नियिन सेल्वन हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

Movie Advance Booking News
Aishwarya Rai Pregnant : ऐश्वर्या दुसऱ्यांदा गर्भवती? ओव्हरसाईज ड्रेसमध्ये दिसली

चित्रपटाची मर्यादित आगाऊ बुकिंग शनिवारी सुरू झाली आणि दक्षिणेकडील चित्रपटगृहांमध्ये पहिले बुकिंग सुरू झाले. पोन्नियिन सेल्वनची आगाऊ बुकिंग एवढ्या वेगाने वाढली की चित्रपटगृहांना मॉर्निंग शो ठेवावे लागत आहे. सध्या स्थिती अशी आहे की चेन्नईमध्ये पहाटे ४.३० वाजताचे शो हाऊसफुल्ल झाले आहेत.

दीड लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

सोमवारी सकाळपर्यंत पोन्नियिन सेल्वनची १ लाख ७५ हजारांहून अधिक तिकिटे आगाऊ बुक करण्यात आली आहेत. चित्रपटाने केवळ तमिळच्या आगाऊ बुकिंगमधून ३ कोटींहून अधिक कमाई केली आहे. पोन्नियिन सेल्वनचे एकूण आगाऊ बुकिंग ३.१५ कोटी रुपये आहे. बुकिंग फक्त चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी सुरू आहे.

Movie Advance Booking News
Urfi Javed : उर्फी पापाराझींना म्हणाली, आज तुम्ही लोक आत जाईपर्यंत व्हिडिओ बनवा

विक्रम वेधाचे आगाऊ बुकिंग

सोमवारी सकाळपर्यंत विक्रम वेधाच्या आगाऊ बुकिंगमधील तिकिटांची विक्री १७ हजारांच्या जवळपास आहे. या बुकिंगवरून विक्रम वेधाचे ॲडव्हान्स ग्रॉस कलेक्शन सुमारे ४५ लाख असल्याचे सांगितले जात आहे. २०२२ मध्ये बॉलिवूडचा सर्वांत मोठा चित्रपट ठरलेल्या ब्रह्मास्त्रची पहिल्या दिवशी जवळपास ६ लाख तिकिटे आगाऊ विकली गेली. ॲडव्हान्स बुकिंगमधून रणबीर कपूरच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १७.७१ कोटी होते. तर कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया २चे ॲडव्हान्स ग्रॉस कलेक्शन ६.५५ कोटी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com