Top Happiest Cities in the World List: कधीच न झोपणारं, सतत धावत असणारं, प्रत्येक मोठ्या संकटातही खंबीरने उभं असलेलं आणि स्वप्नांची नागरी किंवा सिटी ऑफ ड्रीम्स म्हणून मुंबई शहराची सगळ्यांनाच ओळख आहे. आणि आता या सगळ्यांच्याच आवडीच्या मुंबईने अजून एक किताब मिळवला आहे. मुंबई आता भारतातील सर्वात आनंदी शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 'टाइम आउट' या आंतरराष्ट्रीय सर्वेनुसार, यंदाच्या वर्षी मुंबई हे भारतातील सर्वात आनंदी शहर (Happiest City in India) ठरलं असून, जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचलं आहे.