
भीती वाटल्यामुळे किंवा वाईट स्वप्न पडल्यावर अनेकदा लहान मुलं (children) बिछाना ओला( bed-wetting) करतात. मात्र, अशा परिस्थितीमध्ये अनेकदा पालक मुलांना ओरडतात किंवा शिक्षा करतात. परंतु, मुळात मुलं घाबरलेली असतात. त्यामुळे या परिस्थितीत त्यांना ओरडण्याऐवजी त्यांची समस्या जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सोबतच मुलांनी बिछाना ओला करु नये यासाठी नेमकं काय करता येईल याचा विचार करावा. तसंच लहान मुलांना काही बेसिक सवयदेखील पालकांनी लावावी. ज्यामुळे भविष्यात अशा लहान लहान समस्या उद्भवणार नाहीत. (tips-for-bed-wetting-problems-in-children)
१. झोपण्यापूर्वी टॉयलेटला जाण्याची सवय -
लहान मुले झोपायला जाण्यापूर्वी त्यांना टॉयलेटमध्ये नेणं अत्यंत गरजेचं आहे. मुलांनी रात्री झोपेत अंथरुन ओलं करु नये असं वाटत असेल तर त्यांना दररोज झोपण्यापूर्वी बाथरुमला जाण्याची सवय लावावी.
२. मुलांशी संवाद साधा -
अनेकदा रात्री मुलांना बाथरुमला लागल्यावर ते जागे होतात. मात्र, आई किंवा वडिलांना उठवलं तर ते ओरडतील या भीतीने ते बाथरुमला न जाताच झोपून घेतात. परंतु, लघवीची संवेदना ताणून धरल्यामुळे मुलांना त्रास होतो व ते बेडवरच लघवी करतात. त्यामुळे, मुलांना जर रात्री बाथरुमला लागत असेल तर त्यांच्यासोबत उठा त्यांना बाथरुमपर्यंत न्या. तसंच झोपण्यापूर्वी 'गरज वाटल्यास रात्री उठ, असं हक्काने मुलांना सांगा.
३. मुलांना रात्री उठवा -
सुरुवातीच्या काळात रात्री ठराविक अंतराने मुलांना उठवा आणि त्यांना लघवीसाठी घेऊन जा. एकदा मुलांना या गोष्टीची सवय लागली की ते रात्री स्वत: उठतील व बाथरुममध्ये जातील.
४. ट्रेनिंग महत्त्वाचं -
लहान मुलांना टॉयलेटला जाण्याचं ट्रेनिंग देणं अत्यंत गरजेचं आहे. शौचास किंवा लघवी लागल्यावर पालकांना सांगणे, शौच झाल्यावर स्वच्छता कशी बाळगणे, या सगळ्या गोष्टी पालकांनी मुलांना शिकवायला हव्यात.
५. मुलांच्या रुममध्येच टॉयलेट असावं -
शक्यतो मुलांच्या बेडरुममध्येच टॉयलेट असेल याची काळजी घ्यावी. म्हणजे गरज पडल्यास मुलं लगेच बाथरुमपर्यंत जाऊ शकतात.
६. बाथरुममध्ये लाईट हवा -
अनेकदा रात्री अंधारात उठण्याची मुलांनी भीती वाटते. त्यामुळे ते शौचास जाण्याचंही टाळतात. परिणामी, पोटावर ताण आल्यामुळे मुलं बेड ओला करतात. त्यामुळे बाथरुममध्ये कायम एक लहान लाईट चालू ठेवाव. म्हणजे मुलं न घाबरता बाथरुममध्ये जाऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.