Tomato Pickle Recipe : हाडं मजबूत बणवणारं टोमॅटोचं लोणचं रोज खावं, रेसिपी बघून घ्या! | Tomato Pickle Recipe : tomato pickle with sugar recipe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tomato Pickle Recipe

Tomato Pickle Recipe : हाडं मजबूत बणवणारं टोमॅटोचं लोणचं रोज खावं, रेसिपी बघून घ्या!

 Tomato Pickle Recipe : टोमॅटो हे (सिट्रस) लिंबूवर्गीय फळ आहे. यामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के मुबलक प्रमाणात आढळतात. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असतात. तसेच कॅल्शिअम, आयर्न, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, झिंक यासारखे भरपूर तत्त्व असतात. त्यात ॲन्टीऑक्सिडेंट गुण ही आढळतात.


डायट करणारे लोक नेहमी टोमॅटो खाण्यावर भर देतात. पण लहानपणी भूक लागली म्हणून टोमॅटोवर साखर टाकून खाणारे लोक आता त्याला विसरून गेलेत. टोमॅटो भाजीत घातला तरी त्याला बाजूला करणारे अनेक महाभाग आहेत.

काही लोकांना टोमॅटो कच्चा खायला आवडत नाही. अशा लोकांसाठी आज आपण एक रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे टोमॅटोचं लोणचं कसं करायचं. याला तुम्ही टोमॅटोची चटणीही म्हणू शकता.

आजपर्यंत तुम्ही आंबा, लिंबू, मिरची आणि गाजर यापासून बनवलेल्या अनेक प्रकारची लोणची चाखली असतील. पण कधी तुम्ही टोमॅटोपासून बनवलेले चटपटीत लोणचे चाखले आहे का? नसेल तर ही रेसिपी ट्राय करा आणि झटपट बनवा टोमॅटोचे आंबट गोड लोणचे. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे इंस्टंट बनवणारे हे लोणचे लवकर खराब होत नाही.

साहित्य

  • 2 - टोमॅटो

  • गरजेनुसार मिरची पूड

  • आवश्यकतेनुसार कच्चे शेंगदाणे

  • गरजेनुसार जिरे

  • आवश्यकतेनुसार मीठ

  • गरजेनुसार लसूण

  • गरजेनुसार मोहरीचे बियाणे

  • गरजेनुसार मेथीदाणे

  • ३ टीस्पून साखर

टोमॅटोचे आंबट-गोड लोणचे कसे बनवावे

- सर्वप्रथम कढई तापवून घ्या. आता त्यात मेथी घालून काही मिनिटे परतून घ्या. मेथी थंड झाल्यावर त्यात मोहरी घाला. आता मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून त्याची पावडर तयार करा.

- दुसरा पॅन घेऊन तो गरम करा. आता त्यात तेल घालावे. त्यात टोमॅटोचे मोठे तुकडे घालून चमचा ढवळून चांगले शिजवावे.

टोमॅटोच्या वर साखर घाला आणि हे मिश्रण साखर चांगले शिजूपर्यंत शिजवा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगले मिक्स करावे.

- त्यानंतर त्यात मोहरी आणि मेथी पूड घालून वर लाल मिरच्या घालून चमच्याच्या साहाय्याने चांगले मिक्स करावे. आपले लोणचे तयार आहे, ते हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा.

जेवणात रोज टोमॅटो खाण्याचे फायदे

  • व्हिटामिन-सी त्वचेसाठी भरपूर फायदेशीर असते.

  • हृदयसंबंधित रोगांपासून बचाव होतो.

  • युरीन इन्फेक्शनपासून बचाव करते.

  • रक्तशुद्धी होते.

  • पचनशक्ती वाढवते

  • पालकाच्या रसात टोमॅटोचा रस मिसळून पिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

  • टोमॅटोमध्ये असलेल्या व्हिटॅमिन के मुळे हाडे मजबूत होतात.

  • टोमॅटो चेहऱ्यावर घासून लावल्याने चेहऱ्यावर चमक येऊन कोरडी त्वचा मुलायम होऊन मॉइश्चराइज होते.

  • बिया नसलेल्या टोमॅटोचा सॅलडमध्ये वापर केल्याने किडणी स्टोनची शक्यता कमी होते.

  • रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी टोमॅटो लाभदायक आहे.

  • स्मोकिंगमुळे शरीराला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी टोमॅटोचे सेवन फायदेशीर ठरते.