उन्हाळ्यासाठी ‘टॉप’ पर्याय

उन्हाळ्यातही प्रेझेंटेबल राहण्यासाठी बुटीक ट्रेंड कपड्यांना पसंती असते. यातील काही ट्रेंड नवे तर बरेच ट्रेंड म्हणजे जुनीच फॅशन नव्या रूपात परतली आहे.
उन्हाळ्यासाठी ‘टॉप’ पर्याय

- पृथा वीर

उन्हाळ्यातही प्रेझेंटेबल राहण्यासाठी बुटीक ट्रेंड कपड्यांना पसंती असते. यातील काही ट्रेंड नवे तर बरेच ट्रेंड म्हणजे जुनीच फॅशन नव्या रूपात परतली आहे. नावीन्यपूर्ण प्रयोग करताना जुनी फॅशन व नव्या पिढीची आवड लक्षात घेऊन नवी फॅशन येते आहे. जुन्या फॅशनचे हे अपसायकलिंग ट्रेंडी आहे हे पण नक्की. त्यात कुर्ते किंवा कुर्तीज हे ‘ऑल टाइम फेवरिट’ आहेत.

उन्हाळ्यात कॉटन कल्चर जोरात असते. ऋतुमानानुसार कॉटनचे कुर्ते अगदी उत्तम पर्याय ठरतात. कॉटनसोबत गडद रंगातला ‘बाटीक’ पॅटर्न थोडा बांधणी प्रकारासारखा दिसतो. एकदम सॉफ्ट कॉटन हा प्रकार ऑफिस, कॉलेजसाठी छान पर्याय आहे.

या दिवसात बाटीक पॅटर्नवर पांढऱ्या रंगांना सेमी पटियाला जास्त खुलुन दिसतो. यासोबतच लाँग फ्रॉक स्टाईल कुर्ते डिझायनर कलेक्शनमध्ये मिळतात. जीन्स, जेग्नीस अगदी चुडीदारवरही लाँग फ्रॉक पॅटर्नची फॅशन खूप सुंदर दिसते. यावर साधी पोनी हेअर स्टाईल, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खूप सुंदर दिसते.

‘ब्लू इंडिगो’ सुधु शंभर टक्‍के कॉटन फॅब्रिक असल्याने वर्षानुवर्षे फॅशन ट्रेंडमध्ये आहे. म्हणूनच फॅशन ट्रेंड सेंटरचे हे आवडते फॅब्रिक ठरते. नावाप्रमाणेच या प्रकारात निळा रंग हा बेस कलर आहे. अनकॉमन मटका गळा व मशीनचे थ्रेड वर्कची कमाल या साध्या कुर्त्यालाही दिलखेच बनवते. इंडिगो टॉपसोबत पांढरी स्ट्रेट पँट छान दिसते.

यावर छानसा अंबाडा, हँगिगचे कानातले किंवा झुमके आणि पिंक किंवा येलो ग्लासचा गॉगल असा मिक्स मॅच एकदा नक्की करून बघा. ईकत व दाबू पॅटर्न हे पारंपरिक भारतीय फॅब्रिकचे कुर्तेही समर कलेक्शनमध्ये आहेत. उन्हाळ्यातील अजून एक सर्वोत्तम कलेक्शन म्हणजे फ्लोरल पॅटर्न. पायघोळ फ्लोरल पॅटर्न कुर्तीवर छानशी एम्ब्रॉयडरी सुंदर दिसते. अनारकली पॅटर्न, लॉंग कुर्ते शिफॉन प्रकारात मिळतात.

यामध्ये मल्टीकलरपासून ते लाइट पिंक, लाइट ब्लू, लाइट पर्पल, लेमन कलर, ऑफ व्हाइट ते अगदी लाइट रेड असे कितीतरी प्रकार आहेत. लखनवी कुर्ती आणि ब्लू जीन्स किंवा ब्लू जेगीन्सचा ट्रेंड आजवरचे सर्वाधिक लोकप्रिय कॉम्बिनेशन यंदाही बघायला मिळते. या दिवसात जीन्सचाही कंटाळा येतो. म्हणूनच पांढरा पटियाला, सेमी पटियाला, स्ट्रेट पँट, साधी सलवार ते पेन्सिल जेगीन्स हे पर्याय आहेत.

या कोणत्याही पांढऱ्या कलेक्शनवर डार्क किंवा लाइट कलर कुर्ते छानच दिसतात. उन्हाळ्यात पलाझोमध्ये वावरणे सोपे जाते. ऑफिस अटायर म्हणूनही पलाझो छान दिसते. उन्हाळ्यात तर चिकनचे पांढरे पलाझो खूप छान दिसतात. कोणत्याही कुर्तीसोबत मॅच करता येतात. पलाझो पायाघोळ असली, तरी त्याची बॉटम मोठी असते. हा रेट्रो स्टाईल ट्रेंड सत्तरच्या दशकात लोकप्रिय होता. तो पुनःपुन्हा नव्या रूपात येतो.

काही कानमंत्र...

  • कुर्ते किंवा टॉप अशा कोणत्याही पॅटर्नवर खुलून दिसते ती अँटिक ज्वेलरी. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, लाकडाची ज्वेलरी, लांब बीटसच्या माळा छान दिसतात

  • कॉटन कुर्ती घ्या किंवा फ्लोअर टच फ्लोरल पॅटर्न, उन्हाळ्याच्या दिवसांत थ्री फोर्थ स्लीव्हज उत्तम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com