फक्त प्रेम नव्हे, पार्टनरमध्ये 5 खास क्वालिटी शोधतात तरुणी

relationship, women, successful relationship
relationship, women, successful relationship

फक्त प्रेमाच्या जोरावर नाते बहरदार आणि यादगार पद्धतीने फुलेल, अशी कल्पना करणे योग्य ठरणार नाही. रिलेशनशिपसंदर्भातील एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. तरुणी आपल्या पार्टनरमध्ये प्रेमाशिवाय काही खास गोष्टी शोधत असतात. जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्यामुळे तरुणी एखाद्या तरुणाकडे आकर्षित होतात. किंवा एखाद्या तरुणामध्ये विशेष गोष्टी आहेत.   

1. विनम्रपणा
तरुणींना आपल्या पार्टरमध्ये विनम्रपणा हवा असतो. अशोक सराफ यांच्या एका चित्रपटातील डायलॉगप्रमाणे तरुणींना आपला जोडीदार शुद्ध, सज्जन आणि शंभर नंबरी हवा असतो. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील सव्हेत बहुतांश महिलांनी विनम्र आणि दयाळू जोडीदार असावा असे मत नोंदवले. 

2. बुद्धिमान:

बहुतांश महिला या  जोडीदार बुद्धिमान असावा यावर भर देतात. बुद्धिमान याचा अर्थ डिग्री आणि उच्च शिक्षा घेणारा एवढाच अभिप्रेत नसतो. शिक्षण कमी असूनही बुद्धिमताच्या जोरावर खूप काही मिळवणाऱ्या व्यक्तीकडे महिला अधिक आकर्षित होतात.  

ब्रा निवडणे जोडीदार शोधण्यापेक्षा अवघड; त्यामुळे खबरदारी गरजेची​

3. उदार मनाचा माणूस 
सध्याच्या घडीला उदारता ही शोधून सापडणे कठिण अशीच परिस्थिती आहे. ज्या व्यक्तींमध्ये उदारतेची भावना असते अशा व्यक्तीमत्वाच्या पुरुषांकडे महिला अधिक आणि सहज आकर्षित होतात, असे अभ्यासातून समोर आले आहे.  

4. आत्मविश्वास- 
आत्मविश्वासू व्यक्तिमत्वाला महिला अधिक पंसत करतात. एखादी गोष्ट करण्याचा आत्मविश्वास आणि त्यासाठीची जिद्द बाळगणाऱ्या पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात. 
 

5. भोळा स्वभाव :

साधेपणासोबतच कोणतीही गोष्ट मनात न ठेवता आपली मते मांडणारा तसेच दिखावेपणा न करता जसे आहे तसं स्वत:ला प्रेझेंट करणाऱ्या व्यक्तीलाही अधिक महिला सहज पंसती देतात. आपल्या पार्टनरमध्ये त्या या गोष्टीचाही शोध घेत असतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com